✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बीड(26जून):-स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड व फुलोरा आयोजितआठवणीतील कवितांचे युट्युब वरील काव्य मैफिल
ख्यातनाम कवी, कवयित्रींची मांदियाळी अवतरली YouTube वर.आणि पालखी सजली काव्य सुमनांनी!
आठवणीतील कविता.. काव्य संमेलन..१४ जून २०२० रोजी यूट्यूब live . या माध्यमातून शानदार सोहळ्यात अनेक दिग्गज लेखक कलाकार आणि नवोदित कवयत्री व हौशी कलाकारांनी आपल्या कविता सादर केल्या आणि आपल्या अनुभव संपन्न मार्गदर्शनाने रंगत आणली
ईश स्तवन सिया रायसोनी ही ५ वर्षाची बाल कलाकार आणि सरस्वती स्तवन सादर करणारी युवा गायिका दिशा हाटकर अशा वयोगटातील कलाकारांसोबत ज्येष्ठ नागरिक कलाकारांनी प्रसिद्ध कवी आणि कवयत्री च्या कविता आपल्या ओघवती शैलीत सादर केल्या. तसेच स्वानंद संस्थेच्या कार्याचा आढावा सादर झाल्यानंतर..मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन झाले. स्वानंद पुणे संस्थेच्या अध्यक्षा रंजनाताई लोढा यांचं स्वागतपर मार्गदर्शन झाले स्वानंद संस्था*पिं. चिं. च्या प्रा. सौ. सुरेखा कटारिया यांनी त्यांच्या प्रास्ताविक पर भाषणातुन महिलांना स्वतःचा सर्वांगिण कसा साधावा तसेच सकारात्मक रहा असे बहुमोल मार्गदर्शन केले*.
प्रसिद्ध संभाषण कौशल्य तज्ञ व मोटिव्हेशनल वक्त्या डॉ. श्वेता राठोड यांनी सकारात्मक विचार विचाराने आपले कलेचे सादरीकरण कसे असावे हे आतिशय सोप्या भाषेत सांगितले सुनीता देसर्डा यांनी मनोगत व्यक्त केले
डाॕ मा.अशोक जी
पगारिया, संमेलन
अध्यक्षा मा. नीलमजी माणगावे, उद्घाटक मा.श्री.मोहन कुलकर्णी.यांची उदघाटन शुभेच्छा पर भाषणे झाली
तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शाळीग्राम भंडारी, समाजसेवक पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी- चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कवी राजेंद्र सोनवणे व मीना पोखरणा, माननीय लक्ष्मण शिवणेकर उपस्थित होते.
संमेलन साठी लाभलेले सर्व प्रसिद्ध मान्यवरांनी मार्गदर्शन पर भाषणातून कलाकारांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पुणे व पिंपरी-चिंचवड सहित महाराष्ट्राबरोबरच बिहार,दुबई येथुन नवोदित व प्रख्यात कवी कवियत्रींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
श्रोत्यांना ख्यातकीर्त अशा शांताबाई शेळके.इंदिराबाई संत, बहिणाबाई चौधरी, प. पू.साध्वी प्रिती सुधाजी*प पू साध्वी अर्चनाजी साध्वी प पू आखाश्रीजी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या रचना सादर केल्या.
सौ. सीमा गांधी यांच्या ओघवत्या निवेदनाने संमेलनास बहारदार रंग आणली
अविट गोडीच्या कविता काव्य संमेलनाची सांगता
छान सादरीकरण केलेल्या उदयोन्मुख युवा कलाकार
१)दिशा योगेश राठोड,
२)गायत्री प्रवीण देसरडा,
३)भक्ती रवींद्र कुलकर्णी.
उत्कृष्ट सादरीकरण
१)रविंद्र गौतमचंद रायसोनी,
२)निधी आकाश जैन,
३)डॉ.सलोनी बेदमुथा
4)सौ.शुक्ला प्रवीण मुनोत
5) सुलभा मराठे
6) सुप्रिया लाड
यांना उत्कृष्ट सादरीकरणाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संमेलनाचे सुत्रसंचलन सौ. सीमा शिरीष गांधी यांनी केले.
सौ.अनुराधा हाटकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी तांत्रिक बाजू सांभाळली शिरिष गांधी आणि राज गांधी यांनी.
अशी माहिती स्वानंद प्रचार-प्रसार मंत्री
सौ. सीमा शिरिष गांधी यांनी दिली.

लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED