सत्यनारायण कि सत्यनिष्ठ, तत्वनिष्ठ कि कपोलकल्पित?……….एक विचार

26

जगातील अनेक तज्ञांनी अनुभवाने सांगितले आहे की, काल्पनिक गोष्टींचा त्याग करून वैज्ञानीक सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ वास्तवरुप स्वीकारा.स्वतःचा जीवनप्रवास, जिवन प्रक्रिया स्वतः अंगिकारल्या शिवाय स्वावलंबी, स्वविकासाला आपल्या पात्रतेनुसार गती मिळणार नाही, पात्रता ही आपलं कौशल्य,शिक्षण व अनुभव इत्यादी गोष्टीवर अवलंबून आहेत. आपल्या पात्रते नुसार आपण आपलं त्या त्या क्षेत्रात कार्याला न्याय मिळवून देऊ शकतो अर्थात काल्पनिक गोष्टीचा,भ्रमिष्ट गोष्टींचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार केला तरच ते शक्य आहे.कर्म,कष्ट,मेहनत कार्याला विकासाला गतिमान करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनच फलदायी ठरतो ना कि,काल्पनिक,भाकडकथा इथं प्रत्येक जण आपापल्या परीने श्रध्दा, भक्ति अंधविश्वास,वैज्ञानिक दृष्टिकोन,सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ किवास्तवरुपी याचा विचार करु शकतो हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरी समाजात राहायाचे असेल तर सर्वागीण विकासाला खूप महत्व आहे.परमोच्च आनंद कुठ मिळतो तो शोधणे हा आपला अधिकार आहे.असत्यनारायणाची भाकडकथा ऐकून समाधान होत असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन चुकीचाच असेल.आग लागली,पाण्यात बोट डुबली,कोणती कथा सांगून ती आग विझत असेल.

पाण्यात बुडणारी बोट वर येत असेल तर अमेरिका,जपान,रशियाच्या मोठमोठ्या बोटी बुडल्या तर त्या वर आणण्यासाठी त्यांनी भारतातील भटा ब्राम्हणाना त्यांच्या वाजना पेक्षा जास्त दक्षिणा देऊन कथा सांगून बुडालेल्या बोटी बाहेर काढला असत्या. एक देश दुसऱ्या देशाचे तंत्रज्ञान विकत घेऊन आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करत असतो.मग हे सत्यनारायण कथा भारताच्या बाहेर परदेशात प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध व विकसित झाली असती.पण ती फक्त मागासवर्गीय ओबीसी मराठा समाजाच्या घराघरात कायम पोचली आहे.
आज जगाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु आहे नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत.विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती होत आहे.विकासाचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्या समोर ठेऊन होईल.भारत ही त्याच मार्गाने कॉम्प्युटर,स्मार्टफोन मोबाईल शहरात सोडा खेड्यापाड्यात घराघरात पोचला आहे.त्याच प्रमाणे दोन चाकी मोटरसायकल,तीन चाकी रिक्षा,चार चाकी छोटा हत्ती टेम्पो मोठ्या प्रमाणात खेड्यापाड्यात शेतकरी,शेतमजूर आणि प्रवाशांना आत्मनिर्भर बनवीत आहे. दुसऱ्या देशाचे तंत्रज्ञान विकत घेतल्यामुळे आपला विकास होत आहे हे शंभर टक्के सत्य मान्य करावे की त्यांची सुरुवात ही सत्यनारायण महापूजा घालून करावी हे स्वीकारण्याचा संपूर्ण अधिकार आपल्या संविधानात दिला आहे.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी घरदार परिसर स्वच्छ असला पाहिजे.हातात झाडू घेऊन घाण साफ करणारे गाडगेबाबा सर्वांना माहित आहेतच.पण तर्काच्या बुद्धिमत्तेने लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे गाडगेबाबा सोईस्कर पणे दुर्लक्षीत ठेवण्यात आले.मुंबई येथील शेवटच्या किर्तनात त्यांनी सत्यनारायणाच्या कथेतील फोलपणा सांगत, चिकित्सा करण्याचा मोलाचा संदेश दिला होता तो सोयीस्कर पणे विसरल्या जातो.निरक्षर माणसे सत्यनारायणाची पुजा करतांना त्यांचे अज्ञान समजु शकते.पण आजकाल उच्चशिक्षित माणसांचे प्रमाणच जास्त आहे.म्हणूनच गाडगेबाबानीं ‘चाल्ले सारे बह्याड बेलने सत्यनारायण कराले’ असे म्हटले होते.

“सत्यनारायणाच्या कथेत बुडालेले जहाज, सत्यनारायणाची पुजा केल्यामुळे वर येते.”गाडगेबाबांनी बुध्दिप्रामाण्यवादाच्या जोरावर,जर सत्यनारायणाच्या पुजेमुळे बुडालेले जहाज वर येत असेल तर,इंग्रजांचे कितीतरी सोन्याने भरलेले जहाज समुद्रात बुडलेले आहेत,ते वर काढून दाखवा असे आव्हान त्याकाळी केले होते,गाडगेबाबांचे आव्हान आजपर्यंत कोणीही स्विकारले नाही,किंवा पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले नाही.सत्यनारायण कशी भटांची रोजगार हमी योजना आहे हे गाडगेबाबांनी लोकांना पटवून दिले होते तरीही आपण चिकित्सा न करता,सत्यनारायणाची पुजा करतच असतो आणि गाडगे बाबांचे फोटो,घरात, स्टेटस,डी पी ला लावतच असतो.गाडगेबाबा यांनी एकप्रकारे हा संदेश दिला आहे कि, अंधश्रद्धा दुर करा आणी सत्यनिष्ठ वैज्ञानिक मार्गाने वाटचाल करा.ओबीसीनी मात्र एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ कि कपोलकल्पित?.याचा कधीच गांभीर्याने विचारच केला नाही.

देशात ८५ टक्के ओबीसी मागासवर्गीय समाजाचे कट्टरपंथीय हिंदू लोक आहेत ते सहा हजार जाती मध्ये विभागलेले आहेत.ते सर्वच लग्नकार्य,सुख,शांती,शुभ लाभसाठी सत्यनारायण महापूजा इमाने इतबारे दरवषी घालतात.कधीच आपण कोण कोणत्या जातीचे सत्यनारायण का घालतो कधी सत्यनिष्ठ,तर्कनिष्ठ,तत्वनिष्ठ पद्धतीने विचार करीत नाही. ती पूजा घालतांना फक्त आम्ही कट्टरपंथीय हिंदू असतो.शिक्षण,नोकरी,बेटी व्यवहार करतांना मात्र आम्ही ओबीसी मधील एक जात,पोट जात असतो.हे मात्र कोणताही हिंदू विसरत नाही.तेव्हा मात्र आम्ही कधीच एक भारतीय नागरिक नसतो.आमचे आराध्यदैवत प्रेरणास्थान प्रभु विश्वकर्मा हे सृष्टी निर्माता आहेत. असे आपण आजच्या सोशल मीडियावर बघतो विशेषतः विश्वकर्मा प्रकट दीना निमित्ताने.तसे आम्ही प्रत्येक कार्यात त्याची पूजा अर्चा,आराधना नामजप करतोच.तेव्हा मला प्रश्न पडतो तेव्हा हे विश्वकर्मा फक्त सुतार समाजाच्या ओबीसीचेच का?. इतर ओबीसी सत्यनारायण स्वीकारतात मग हे सृष्टी निर्माण करणारे प्रभू विश्वकर्मा इतर कोणत्याही हिंदूंचे आराध्यदैवत प्रेरणास्थान का नाही. त्यामुळे ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि आपल्याला जग दाखविले त्या सृष्टी निर्मात्या बाबत असा टोकाचा भेदभाव का होतो,किंवा भेदभाव का केला जातो.

यांची एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ तर्कनिष्ठ पध्दतीने चिकित्सा उच्चशिक्षित,थोर विचारवंत,साहित्यिक,बुद्धीजीवी संपादक,पत्रकार,डॉक्टर प्राध्यापक मंडळी का करीत नाही.खेड्यापाड्यातील अशिक्षित अज्ञानी सत्यनारायण महापूजा रीतीरिवाज,परंपरा म्हणून घालतो हे आपण समजू शकतो.पण उच्चशिक्षित थोर विचारवंत,साहित्यिक,बुद्धीजीवी संपादक,पत्रकार,डॉक्टर प्राध्यापक मंडळी सुद्धा या रीतीरिवाज परंपरेला बळी पडत असतील तर भविष्यात येणारी तरुण पिढी विज्ञानवादी, सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ,बुद्धिवादी कशी बनेल?.यांचा विचार कोण करेल?. त्यावर निर्भीडपणे निपक्षपातीपणे महात्मा ज्योतिबा फुले,प्रबोधनकार ठाकरे,जेधे जवळकर सारखे कोण लिहणार.जो समाज वधुवर मेळाव्यात मग्न असेल तो समाज प्रबोधन करण्याचे ध्येय,उद्दिष्ट कसा काय करू शकतो.तो स्वप्न सुद्धा सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ पाहू शकत नही.त्याच्या डोक्यातील मेंदू हा कोणत्या तरी अलिखित असत्य सत्यनारायण कथेचा मानसिक दुष्ट्या गुलाम आहे.एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ यावर बोलले पाहिजे,चर्चा,संवाद परिसंवाद झाला पाहिजे.

आणी वैचारिक दृष्टीने चिंतन मनन झाले पाहिजे.सुतार समाज आदर्श समाज जो वधुवर मेळावा,लग्न समारंभ सदिच्छा गाठी भेटी यालाच सामाजिक चळवळ म्हणत असेल तर असा समाज प्रबोधनाची क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करू शकणार नाही.जो समाज जमिनीवर हजारोंच्या संख्येने एखाद्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक राजकीय समस्या सोडविण्यासाठी आंदोलनात एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही तो समाज परिवर्तनाच्या गप्पा कशा करू शकेल “ज्या समाजाचा इतिहास नसतो.तो कधीच शासनकर्ता बनत नाही.कारण इतिहासातून प्रेरणा मिळते,प्रेरणेतून जागृती होते.जागृतीमुळे विचार करण्याची पद्धत बदलते,विचारामुळे ताकद निर्माण होते,ताकद मुळे शक्ती बनते,आणि संघशक्तीमुळेच शासनकर्ती जमात बनता येते.”एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ तत्वनिष्ठ विकासात्मक ध्येय धोरणं उद्दिष्ट तयार करून साध्य करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो व नम्र विनंती करतो.मनात विचार आला मन मोकळं केलं.सुतार समाज आदर्श समाज शिवाय उच्चशिक्षित,सुशिक्षित मान्यवरांचा असा आमचा फक्त सुतार समाज नाही तर ओबीसी सुतार समाज आहे.एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ,तर्कनिष्ठ चिकित्सा व समीक्षा कधी तरी कोणी केला असेल.पण समाज जागृतावस्थेत दिसत नाही.म्हणूनच मी हा एक विचार सत्यनारायण कि सत्यनिष्ठ,तत्वनिष्ठ तर्कनिष्ठ पद्धतीने लिहण्याचा प्रयत्न मोठ्या हिंमतीने केला आहे.त्यात काही चूक भूल असेल तर मनमोकळ्या चर्चा करावी हे मी जाहीरपणे आवाहन करतो.

✒️प्रमोद सूर्यवंशी(चिखली,मातृतीर्थ बुलडाणा)मो:-८६०५५६९५२१