?पोंभुर्णा येथील चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथे ऑनलाइन सभा?

    53

    ✒️पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पोंभुर्णा(दि:-26 जुन) स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे नुकतीच ऑनलाइन सभा गुगल मीट या ॲप द्वारे घेण्यात आली. या ऑनलाईन सभेमध्ये महाविद्यालयामध्ये ताळेबंदी लागण्यापूर्वी पूर्ण झालेल्या विविध अभ्यासक्रमाचे
    नोंद घेण्यात आली. या सभेत गोंडवाना विद्यापीठाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या विविध परिपात्रकांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. तसेच शासनाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा पद्धतीवर चर्चा करण्यात आली. या ताळेबंदी च्या काळात प्राध्यापक वृंदांनी विविध शैक्षणिक उपक्रमात भाग घेऊन त्याचा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कसा उपयोग होईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. या ताळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम राबविण्यात आले त्याबद्दल कार्यकारी प्राचार्य डॉ. हुंगे यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले.

    महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी व प्रशासकीय अधिकारी या ताळेबंदीच्या काळात केंद्र शासन आणि राज्यशासन यांच्या विविध नोंदणीकृत संस्था द्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनार, सेमिनार, कार्यशाळा तसेच उजळणी वर्ग, प्राध्यापक विकास कार्यक्रम इत्यादी उपक्रमात सहभागी नोंदवला. या ऑनलाईन सभेची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली. या सभेला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय अधिकारी असे एकूण १८ सदस्य ऑनलाइन पोर्टल द्वारा उपस्थित होते. या सभेचे आभार महाविद्यालयाचे ग्रंथालय व महितीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक सतीश पिसे यांनी केले व सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली. या ऑनलाइन गूगल मीट सभेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख व प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनंत देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.