उच्चाराला आचरणाची जोड महत्त्वाची- दत्ता महाराज बोर्डेकर

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24मार्च):-सार्वजनिक जीवनात वावरताना फक्त आपला उच्चार चांगला असन महत्त्वाचं नसून उच्चाराला आचरणाची जोड असणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत प्रसिद्ध दत्त कथा प्रवक्ते ह भ प दत्ता महाराज बोर्डेकर यांनी मंगळवारी दत्त संस्थान दत्तवाडी येथे बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना महाराज म्हणाले की, प्रत्येक जण आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला एक आदर्श व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर फक्त बोलणं महत्त्वाचं नसून त्याबरोबर बोलल्यासारखं प्रत्यक्षात आचरणात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जो चांगल्या गोष्टी आचरणात आणतो तोच व्यक्ती देवाला आवडतो असेही ते म्हणाले.

गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध दत्त संस्थान दत्तवाडी येथे मागील चार दिवसापासून दत्त कथा सुरू असून या परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहेत. त्यानंतर कथा ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सखाराम बोबडे पडेगावकर याचा या ठिकाणी भक्तांसाठी एसटी महामंडळाची बस सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावरून सत्कार करण्यात आला. ह भ प माणिक महाराज शास्त्री नावेकर ,संतोष महाराज शास्त्री हटकरवाडीकर ,रामेश्वर भोसले पाटील शेषराव आव्हाड आदी मान्यवरांचा सत्कार ह भ प नागनाथ महाराज पुरी यांनी केला. ह भ प प्रभाकर महाराज बचाटे रामेश्वर बचाटे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमानंतर भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.