आमदार संतोष बांगर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे पुसद येथे दहन

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26मार्च):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा, अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल १ हजार कोटी रूपये निवडणुकीत घेतलेत व हेलिकॅप्टर सवारी केली अश्या एकेरी भाषा वापरनाऱ्या आमदार संतोष बांगर याचा खरपूस समाचार घेत पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोडे मारो आंदोलन करीत जाहिर निषेध करण्यात आला.केलेल्या वक्तव्या प्रकरणी पुरावे सादर न केल्यास आ. संतोष बांगर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ते दिसतील तिथे त्यांना जाब विचारण्यात येईल या प्रकरणी त्यांचेवर गुन्हा दाखल न झाल्यास बहुजन वंचित आघाडी या पुढे उग्र आंदोलन छेडणार असल्याचे बुद्धरत्न भालेराव यांनी आंदोलन दरम्यान सांगितले.

या आंदोलनाला बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, बुद्धरत्न भालेराव, तालुका उपाध्यक्ष, प्रकाश खिल्लारे, भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, मिलिंद पठाडे, प्रशांत सरोदे, विशाल डाके, किशोर कांबळे, शुभम खंदारे ,सिद्धार्थ बर्डे ,राहुल धुळे ,वैभव सुर्यवंशी, विनोद कोल्हे ,शिलानंद कांबळे, धम्मपाल पठाडे ,राहुल झुंजारे, सामाजिक कार्यकर्ता विष्णू सरकटे ,अण्णा दोडके, वैभव वाघमारे, विजय निखाते, सिद्धार्थ खडसे, आकाश सरोदे, विशाल कांबळे ,आकाश चराटे, निशांत कांबळे , महिला कार्यकर्ता पद्माताई दिवेकर, विद्याताई नरवाडे सुनीताताई करमनकर,परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळ शिवाजी वार्ड पुसदइत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.