शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि मुख्याध्यापक घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय

5

वर्धा, :
कोरोनामुळे यावर्षी शाळा सुरू होण्यास विलंब होणार आहे. मात्र विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊन नये यासाठी विद्याथ्र्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन स्थानिक प्रशासन,ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचे मुख्या ध्यापक यांनी संयुक्तपणे चर्चा करून, गावातील परिस्थितीचा, शाळेतील विद्यार्थी संख्येचा आणि पालकांच्या मानसिकतेचा विचार करून गावातील शाळा सुरू करण्याचा निर्णय कळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
यासाठी उद्या २६ जूनला गावात शाळा व्यवस्थापन समिती ची बैठक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या १५ जूनच्या शासन निर्णयान्वये टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. पहिल्या टप्यात इयत्ता ९ वी, १०, १२वी चे वर्ग २० जुलै पासून सुरू करण्याचे नियोजन करायचे आहे.. यासाठी गावातील सद्यस्थिती, विद्याथ्र्यां ची पटसंख्या, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग चा अवलंब करून त्याप्रमाणात उपलब्ध वर्गखोल्या, शाळेतील शिक्षाकांची उपलब्धता, या सर्व बाबींचा विचार करून गावातील शाळेसंदर्भात निर्णय घेण्यात यावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यानुसार सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीची २६ जुन रोजी बैठक आयोजित करुन मार्गदर्शक सुचनेनुसार शाळा सुरु करण्यापुर्वीची तयारी बाबत कार्यवाही करावयाची आहे. स्थानिक परिस्थिती प्रत्यक्ष सुरक्षित शारीरीक अंतर ठेऊन शाळेत किंवा व्हि.सी. किंवा व्हॉट्स अ‍ॅप व्दारे सदर बैठक आयोजित करावी.सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, मास्कचा वापर आदी बाबींची अंमलबजा वणी अतिशय महत्वपूर्ण आहे. याबाबत शासनाने १५ जून रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून त्याप्रमाणेच कार्यप्रणाली तयार करुन शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या सूचना मागविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शिक्षणाधिका-यांना दिले. शाळेची व स्वच्छता गृहाची स्वच्छता, शाळा सुरु केल्यानंतर घ्यावयाची दक्षता, विद्याथ्र्यांची गर्दी होऊ नये म्हणुन करावयाचे नियोजन, ईत्यादी बाबत निर्णय बैठकित घेण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीने शासन निर्णयानुसार विद्याथ्र्यांची सोशल डिस्टंसींग पाळुन बैठक व्यवस्था, त्यासाठी लागणाèया अतिरिक्त वर्ग खोल्या , शाळांची दोन पाळ्यात भरवण्याची तयारी याबाबतही चर्चा करावी. त्यासाठी वर्ग खोली स्वच्छ करुन घ्याव्या. विद्याथ्र्यां ना हात धुण्यासाठी पाणी व साबण किंवा हॅन्ड वॉशची सुविधा उपलब्धता करुन घ्यावी. खाजगी, अनुदानित, विना अनु दानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी स्वच्छता, शाळांचे निर्जंतुकीकरण करावे. नववी , दहावी व बारावी चे वर्ग जुलै पासुन, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्ट पासुन, तिसरी ते पाचवी सप्टेंबर पासुन, पहिली व दुसरी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. इयत्ता अकरावीचे इयत्ता दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निर्णय घ्यावा शाळेत विलगीकरण केंद्र किंवा निवारा केंद्र असल्यास ग्रामपंचायत, नगर पालिका किंवा जिल्हा प्रशासनामार्फत शाळेची स्वच्छता व निर्जंतुकिकरण करुन घ्यावे तसेच सदर शाळा ही शिक्षक, विद्याथ्र्यांच्या वापरा साठी सुरक्षित असल्याबाबचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांनी दयावे. शाळा सुरू करण्यापूर्वी त्या भागात १ महिन्याच्या कालावधीत कोरोना रुग्ण आढळला नाही याची खात्री करूनच शाळा सुरू करण्याची परवानगी शिक्षणाधिकारी यांनी द्यावी. याशिवाय भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास शिक्षणाचा खोळंबा होऊ नये म्हणून ऑनलाईन, डिजिटल किंवा किंपर ऑफलाईन या पद्धतीचे शिक्षण पद्धतीचे नियोजन करावे. यासाठी सर्व पालकांना पूर्वकल्पना देऊन प्रोत्साहित करावे. भविष्यात टिव्ही, रेडिओ इत्यादी माध्यमांव्दारे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होणार आहे. याची पालकांना कल्पना देऊन त्याबाबत मुलांना वापर करण्यास सांगण्यासही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासाठी डायटच्या प्राचार्य यांनी विद्यार्थी किंवा शिक्षक यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये याकरीता शैक्षणिक साहित्याची (ए-उेपींशपीं) निर्मिती करावी. त्यामध्ये प्रथम सत्रातील सर्व घटकांचा समावेश असावा. त्याकरीता जिल्हयातील विषय निहाय, इयत्ता निहाय उत्कृष्ट शिक्षकांच्या अध्यापनाचे व्हिडिओ चित्रण तयार करुन शाळांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.