🔸आरक्षण नियमित ठेऊन ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा🔸

13

🔹राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांंना निवेेदन सादर

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि-27 जून):-भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना नई दिल्ली शाखा चिमूर तालुका चे वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त देशातील आरक्षण नियमित ठेवून ओबीसी चा स्वंतत्र रकाना ठेवण्याची मागणी करीत राष्ट्रपती यांना एसडीओ चिमूर मार्फत तालुका अध्यक्ष ईश्वर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले .

आगामी काळात जनगणना होत असून महाराष्ट्र ओरिसा बिहार तामिळनाडू या राज्यात जनगणना होणार असून केंद्र सरकारने या जनगणेत ओबीसी साठी स्वंतत्र रकाना ची व्यवस्था केली नसल्याने असंतोष पसरला असून केंद्र सरकारने ओबीसी साठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावे भारतीय संविधान मध्ये कलम 15 (4) 16 (4) नुसार वंचित समाजास आरक्षण ची नोंद आहे तेव्हा आरक्षण नियमित ठेवण्यात यावे . ऑल इंडिया ज्यूडीनिसरी सर्व्हिसेस कमिशन ची स्थापना करण्यात यावी . ओबीसींना एमबीबीएस,एमएस ,एमडी प्रवेश साठी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण देण्यात यावे .आदि मागण्याचे निवेदन एसडीओ संकपाळ यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले .
निवेदन देत असताना भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन
तालुका अध्यक्ष ईश्वर डुकरे ,गजानन मुंगले ,गणेश रामटेके ,मुरस्कर आदी उपस्थित होते .