🔷निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी

🔷जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित पिककर्ज उपलब्ध करून द्यावे.संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

✒️जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी)

जालना(दि-27 जून):-जागतिक महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात, संपूर्ण देशात आणि सर्व महाराष्ट्र राज्यात आर्थिक व ईतर अनेक संकटे ओढवलेले असताना अशा बिकट परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढुन सोयाबीन चे बियाणे खरेदी करून आपआपल्या शेतात त्याची पेरणी केली आहे.पंरतु दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत सोयाबीन उगवले नाही.निकृष्ट दर्जाच्या बियाणंमुळे अनेक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.व सोयाबीन न उगवून आल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे.
सध्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होत असल्याकारणाने दुबार पेरणी करूनही हवामान कालावधी च्या अनुषंगाने पिक येईल की नाही यांची शाश्वती देणं खुप जिकरीचे ठरणार आहे. जालना जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन हे पीक प्रचंड प्रमाणावर घेतले जाते.
खरीप हंगामात यंदा चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने पिकाची उगवण चांगल्या प्रकारे होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती,परंतु काही कंपनींचे बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवून आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
        ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची उगवण झालेली नाही त्यांच्या   पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत व संबंधित कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. अश्या मागन्या  निवेदनात करण्यात आल्या आहेेेत.
तसेच याचं संघटनेच्या माध्यमातून अजून एक निवेदन मा.जिल्हाधिकारी जालना यांना देण्यात आले आहे.त्यामध्ये असं निदर्शनास आणून दिलं आहे की अनेक शेतकऱ्यांना पिककर्ज देण्यासाठी बँक चे अकार्यक्षम अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.व दलाल च्या माध्यमातून कमिशनवर जे वशिलेबाजी करतील त्यांनाच बँका पीककर्ज देत आहेत.दलालामुळं अनेक गरजूंना कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.निवेदनात असंही म्हटलं आहे की जालना जिल्ह्यातील गरजूं शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज वाटप करण्यात यावं.

निवेदनावर  कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील मगर,कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना विद्यार्थी सेल चे जालना जिल्हाध्यक्ष श्री.विष्णू भगवानराव गायकवाड,
श्री.भरत शिंदे (सदस्य), प्रसाद भाऊसाहेब गाढे(सदस्य),शिध्दू नखाते(सदस्य), राजेंद्र बालाजी वैद्य(सदस्य) यांच्या सह्या मा.जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनावर आहेत.

कृषिसंपदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED