✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
बल्लारपूर(दि-27 जून)चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्युशन बल्लारपूर तर्फे जगावर आलेल्या नोबल कोरना या संसर्गजन्य रोगावर आळा घालावा या जाणिवेतून व समाजकार्याच्या भावनेतून संस्थेचे सचिव श्री स्वप्नीलजी दोंतुलवार यांच्या प्रेरणेने व श्री प्रशांतजी दोंतुलवार सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात व पुढाकाराने दिनांक २६ जुन २०२० रोज शुक्रवारला बल्लारपूर नगरातील बाजारपेठ येथील ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना व दुकानातील कामगारांना त्याचप्रमाणे आटो स्टँडला जाऊन ऑटो चालक प्रवासी, आसपासच्या परिसरातील फळविक्रेते आणि नंतर नगरपरिषद कार्यालय बल्लारपूर येथे जाऊन शहराचे नगराध्यक्ष श्री हरीशजी शर्मा, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री विपिनजी मुद्दा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री चंदनसिंहजी चंदेल त्याचप्रमाणे कार्यालयातील सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिक यांना सॕनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.