सायगाटा येथील विनापरवानगी मुरूम उत्खनना विरोधात वंचित आघाडी आक्रमक

74

🔹शहरात सत्ताधारी व विरोधी पक्ष हितसबंधात गुंतल्याने वंचित एक पर्याय…!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.2एप्रिल):-तालुक्यात अवैध गौणखनिज चोरीचे वाढते प्रमाण, सत्ताधारी -विरोधक जोपासात असलेले एकमेकांचे हितसंबंध व महसूल प्रशासनाची बघ्याची भूमिका बघता वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरीचे नेते,कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिकेत येत सायगाटा परिसरातून विनापरवानगी सुरु असलेल्या मुरूम उत्खनना बाबत, मुरूम माफिया, साजातील तलाठी व ज्यांचे कडे मुरूम टाकल्या जात आहे अशा सर्व दोषींवर कारवाई करीता उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना तक्रार निवेदन देतं कठोर कारवाईची मागणी केली आहे

सायागाटा मंदिरच्या मागिल बाजूने माहेर-खेड कडे जाणाऱ्या डांबरीकरण रोडलगत शेतातील मुरूम गेली 20-22 दिवसापासून जेसीबीच्या साह्याने सूर्योदय होण्याच्या अगोदर पासुन ते सूर्यास्त झाल्यानंतर देखिल ट्रॅक्टर व ट्रक/हायावाने तहसील कार्यालयाच्या जवळूनच शहराच्या मध्यवर्ती भागातून राजरोसपणे अवैध मुरूम वाहतूक करीत आहेत.याबाबत महत्वाचे म्हणजे ज्या तलाठी साजात हा अवैध मुरूम उत्खनन सुरू आहे त्या साजातील तलाठ्यांनी याबाबत काहीही कार्यवाही करत नाही ही बाब निंदनीय असून कार्यवाहीस पात्र आहे.

शासनाचा महसूल बुडविनाऱ्या या साजातील तलाठी व अवैध मुरूम उत्खनन करून तस्करी करणाऱ्यावर तसेच हा मुरूम ज्यांच्या कडे टाकण्यात येत आहे त्यांच्यावर सुद्धा तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी तर्फे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचेकडे तक्रार निवेदन देतं केली आहे तर सदर तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री चंद्रपूर तथा जिल्हा संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कडे सुद्धा केलेली आहे.