अडगाव बुद्रुक येथे नवीन रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली

24

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.3एप्रिल):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आडगाव बुद्रुक या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार सेवक या पदावर असलेले मोरेश्वर दिवटे यांच्या बद्दल नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी दिसून आली असता ग्रामपंचायतीने ठराव घेऊन घेऊन त्यांना पदावरून कमी करण्यात आले व त्यांच्या जागी नवनियुक्त रोजगार सेवक म्हणून मिलिंद सुरेशअप्पा पतंगराय यांची नेमणूक करण्यात आली त्यावेळी गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालं गावकऱ्यांनी नवनियुक्त रोजगार सेवक स्वागत केले.

गुलाल उधळून आनंद व्यक्त केला व या कार्यक्रमाकरिता नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतीश खानंदे विस्ताराधिकारी संदीप देशमुख ग्रामसेवक विशाल किटे तसेच ग्रामपंचायतचे सरपंच मंगला प्रफुल खडसे उपसरपंच राहुल भेंडोलकर ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पतंगराव जयमाला चोपकर आडगाव बुद्रुक येथील पोलीस पाटील बाबारावजी खोब्रागडे व तसेच गावातील दिनेश भेंडोलकर अरुण परिमल शुभम मोहोड आशिष मस्के प्रवीण चोपकर संतोष चोपकर प्रतिक पतंगराय राहुल भेंडोलकर मनीष परिमल अनिकेत उकेकर मंगेश पतंगराय तुषार मामुरकर राजेश भेंडोलकर मंगेश भेंडोलकर योगेश परिमल युवकांनी प्रामुख्याने सहभाग घेतला तसेच युवा पिढीचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता