बलिदान दिवस व गुढीपाडवा एकनिष्ठा कडून रक्तदान करून साजरा

26

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.4एप्रिल):- जनसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा फाऊंडेशन तर्फे दिनांक 23 मार्च ते हिंदू नववर्ष 2 एप्रिल गुढीपाडव्या निमित्त गरजु रुग्णासाठी रक्तदान शिबिर राबविण्यात आले. सामान्य रुग्णालयात गरजु गरीब थैलीसीमिया, सिकलसिल, या गंभीर आजारग्रस्त तसेच ईतर महिला पुरुष लहान बाळ या रुग्णासाठी हा उपक्रम घेऊन रक्तपुरवठा करण्यात आला. सर्वप्रथम भगतसिंग चौक स्थित शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण पूजा सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. दि. 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी एकनिष्ठा रक्तनायकांनी रक्तदान केले रक्तदात्यांनी खामगांव, शेगांव, बुलढाणा, नांदुरा, मलकापूर, अकोला, अमरावती, नागपूर, मेहकर, वाशिम, शिर्डी, गोंदिया, घाटी आदी गावातील हॉस्पिटल मध्ये गरीब रुग्णांसाठी वेळेवर रक्ताची मदत पुरवली.

तसेच 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांना दिले जीवनदान या उपक्रमात सुरजभैय्या यादव, जितेंद्र मच्छरे, अनिल चव्हाण, दिनेश मुळे, नागेश सिंघन, सिद्धेश्वर निर्मळ, शंभु शर्मा, नीरज ठाकूर, सोनू कौशल, गब्बु गुजरीवाल, दिपक राऊत, मुन्ना पवार, चेतन कदम, प्रदीप शमी, अमोल मुकुंद, गजानन मच्छरे, पंकज चांडक, निलेश झुनझुनवाला, तुषार चव्हाण, गणेश सपकाळ, जगमितसिंग सिद्धू, गजानन मच्छरे, कृष्णा राठी, केतन पांडे, विजय सिरसाट, नाना भोंडे, प्रफुल दांडगे, चेतन कदम, प्रदीप शमी, पांडुरंग कोळसे, अमर यादव, अनंता मानकर, दिपक मच्छरे,दिलीप चौधरी, निखिल हजारे, प्रेम भरसाकले, धनराज सावरकर, लखन बेनिवाल, राधेश्याम गोसामी, विकास खंडारे, रामा हिंगे, सौरभ सावतकर, प्रताप हजारे आदि लोकांनी या उपक्रमात परिश्रम घेऊन रुग्णालयात रक्त उपलब्ध करून दिले 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून बलिदान दिवस हिंदू नववर्ष गुढीपाडवा साजरा केला अशी माहिती विक्की सारवान यांनी दिली.

टीप:- भरपूर काही गोपनीय रक्तदात्यांचे नाव नाही टाकले.