अर्हेरनवरगाव सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास आघाडी पॅनल विजयी

59

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7एप्रिल):-तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली असून सदर निवडणुकीत 13 पैकी 13 ही जागेवर भाजपा व काँग्रेस समर्पित शेतकरी विकास आघाडी पॅनल च्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला. तर याच सहकारी संस्थेतील देवलाल ठेंगरे,विलास ठेंगरे,बाळकृष्ण ठाकरे या तिन्ही माजी अध्यक्षांचा दारुण पराभव झाला.भाजपा व काँग्रेस समर्पित शेतकरी विकास आघाडी पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित शेतकरी आघाडी या दोन गटांमध्ये ही निवडणूक रंगली होती.मात्र मागील पंचवार्षिक पासून शेतकरी विकास आघाडी पॅनल ची सत्ता स्थापन झाली होती.

या वर्षीच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी पॅनल दबदबा कायम असल्याने त्यांनी एकहाती सत्ता खेचून आणली. विजयी उमेदवार विनोद वामन कावळे,सुनीता डाकराम डोनाडकर,सुनीता केवळराम बेदरे,लक्ष्मण नंदनवर,गोवर्धन पांडुरंग डांगे,एकनाथ रामजी उरकुडे,पुरुषोत्तम सीताराम ठेंगरे,प्रकाश मोतीराम डोलारे,पुरुषोत्तम सुदाम डोनाडकर,रामदास सोमजी मिसार,वामन मोतीराम मिसार,उद्धव मारोती राऊत,राजेंद्र सदाशिव सोनवणे होते.सदर निवडणूक तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष वामन मिसार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सरपंच मनोज ढवळे यांच्या नेतत्वाखाली शेतकरी विकास आघाडी पॅनल ने निवडणूक लढवून आपली सत्ता कायम ठेवली आहे.