🔸विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून जागीच मृत्यू🔸

10

✒️गोंडपिपरी-नितीन रामटेके (तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी(27 जून):- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुण मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या तरुण मुलाचे नाव अविनाश संतोष मडावी असे आहे. तो इयत्ता 11 वी ची परीक्षा दिला होता. तो सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान येनबोधला येथे तिघे जण मिळून काही कामानिमित्त गेले होते. जाऊन परत येताना येनबोधला येथील वास्तव्यास असणारे शालीकराव मैदनवार यांचा शेतातून येताना अविनाशला करंट लागल्याने जागीच जीव गेला. सायंकाळी अंदाजे सात ते आठ च्या दरम्यान ही घटना घडली. शालिकराव मैदनवार हे आपल्या शेतामध्ये डुक्कर मारण्याकरिता लाईन चे करंट लावून घरी गेले. त्याच वेळेस अविनाश मडावी व त्याचे दोन मित्र हे तिथून परत येत असताना न कळत अविनाशला करंट लागला. त्याला वाचवण्याचा त्याचा मित्रांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. व अविनाश चा जागीच मृत्यू झाला. ही माहिती घरच्यांना कळताच धक्काच बसला. आता आमच्याशी मिळून बोलून गेला आणि अशी दुर्दैवी घटना घडली याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या घरी आई – वडील व एक बहिण आहे. अविनाश हा त्यांचा घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या घरातील दिवाच मावळला. ही घटना विठ्ठलवाडा गावासाठी दुर्दैवी असून गावात आता शोककळा पसरली आहे.