?शेतातून येताना वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू?

    55

    ?गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना

    ✒️गोंडपीपरी-नितीन रामटेके(तालुका प्रतिनिधी)

    गोंडपिपरी(27जून):- तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरचानी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुटच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीराला वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.