घुग्घुस येथील शिवनगर येथे टँकर द्वारा पाणी पुरवठा होणार- आम आदमी पार्टीच्या मागणीला यश

26

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.12एप्रिल):-नगरपरिषद हद्दीतील शिवनगर वार्ड क्रमांक ०५ इथे मागील कित्तेक वर्षांपासून पाण्याची समस्या होती.ही बाब आम आदमी पार्टी घुग्घुस च्या लक्षात येताच मागील ०९-१० माहिण्यान पासून नगरपरिषद कार्यालय घुग्घुस व वेकोलि ला आम आदमी पार्टी द्वारा वारंवार निवेदन देण्यात आले परंतु याकडे नगरपरिषद प्रशासन व वेकोली द्वारा दुर्लक्ष करण्यात आले.याचीच दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात ११/०४/२०२२ रोजी साखळी उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आले.

ज्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली व उपोषणाच्या दिवशी ११/०४/२०२२ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता नगरपरिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या द्वारा लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले व येत्या एक महिन्याच्या कालावधी मध्ये शिवनगर इथे ०२ बोरिंग बनवू व बोरिंग चे काम पूर्ण होत पर्यंत नगरपरिषद द्वारा शिवनगर इथे टँकर द्वारा पाणी पुरवठा करू असे लेखी स्वरूपाचे आश्वासन देण्यात आले व शिवनगर येथील रस्त्याचे बांधकाम येत्या ०३ महीण्यान मध्ये पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी संपूर्ण घुग्घुस वासियांना संदेश देताना बोलले की घुग्घुस शहरातील नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहू व घुग्घुस गावामध्ये आम आदमी पार्टी एकमेव असा पक्ष आहे जो सदैव नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सतत लढा देत आहे असे सांगितले.

यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, कोषाध्यक्ष अंजली नगराळे, संघटनमंत्री पुनम वर्मा, विजया उपलेति, नसीम शेख, धम्मदिना नायडू, नहिमा शेख, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे,अनुप धनविजय, निखिल कामतवार, प्रफुल पाझारे, अनुप नळे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, रवी शांतलावार, अभिषेक तालापेल्ली, स्वप्नील आवळे, करण बिऱ्हाडे, व समस्त शिवनगर वासी सह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.