दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस तर्फे महिला समता सैनिक दल शिबिर संपन्न

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17एप्रिल):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस तर्फे महिला समता सैनिक दल शिबिर संताजी महाराज सांस्कृतिक सभागृह आकांक्षा नगर दिग्रस येथे नुकतेच संपन्न झाले .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष विनायक देवतळे,उद्घघाटक रविजी भगत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ, प्रमुख मार्गदर्शक पोर्णिमाताई भोसले सिनीयर डिव्हीजन आॉफिसर मुंबई,पुजाताई गायकवाड मेजर रायगड जिल्हा लाभले होते.प्रमुख पाहुणे माजी शिक्षणाधिकारी वाल्मिक इंगोले सामाजिक कार्यकर्ते उद्धव अंबुरे सर होते सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन पंचशिल त्रिशरन घेण्यात आले.रवीजी भगत यांनी समता सैनिक दल शिबिराचे उद्घाटन केले.

या शिबिरा महागाव पोलिस स्टेशन,हिवरा संगम,खडका, आरंभी, लाख रा.,निंबा,विठाळा,सावंगा बु., देऊरवाडा, वडगाव डखरे, इसापूर, हरसुल, निंबा, चिंचोली,कलगाव व दिग्रस येथील 103 महिलांनी शिबिरा मध्ये प्रशिक्षण घेतले या शिबिराला मार्गदर्शक पोर्णिमाताई भोसले सिनीयर डिव्हीजन आॉफिसर मुंबई व पुजाताई गायकवाड मेजर रायगड जिल्हा हे लाभले होते.या मध्ये पिटी परेड,पि सी आर कानुन,अॅट्रोसिटी कानुन,ध्वज सलामी, प्रथमोपचार, समता सैनिक दलाचे कार्य , ध्वजारोहण कार्य पध्दती,खडे खडे शॅलूट लाईन तोड, विसर्जन,आरामसे खडे खडे मुडना इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले.विनायक देवतळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रत्येक गावात महिला सैनिक निर्माण केल्या जाईल असे सांगितले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप नगराळे सुत्रसंचालन उज्वला मानकर व एकनाथ मोगले यांनी केले.आभार तुकाराम उबाळे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक देवतळे, रमेश वहीले,उध्दव अंबुरे सर, प्रदिप नगराळे, यशवंत भरणे, तुकाराम उबाळे, एकनाथ मोगले, चिंतामण मनवर, चंद्रमणी धुळध्वज,प्रा त्रिपाल राहूलगडे सल्लागार, उत्तम इंगोले, देवीदास खंदारे, पुरुषोत्तम मेश्राम, यशवंत सुर्यतळ, नंदू गुजर, भानुदास भगत, अशोक कांबळे, सुभाष मोहोड,गौतम भोवते,गौतम जयगावकर, उज्वला मानकर,मंगला देवतळे, अनुसया वाठोरे, सुजाता चक्रनारायन, वैशाली कांबळे , लताताई भरणे, मिनाक्षी मोरे,वर्षा वागदे सविता मुळे, सुनीता मनवर,स्वाती जमधडे इत्यादीने परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची सरणतय गाथेने सांगता झाली.