केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष्यमान भारत आरोग्य वर्धीनी केंद्रातर्फे तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य मेळावा

30

🔸700 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले

🔹आमदार प्रताप अडसड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविना देशमुख करणार मरणोत्तर अवयव दान

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.19एप्रिल):-ग्रामीण रुग्णालय नांदगांव खंडेश्वर येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष्मान भारत आरोग्यवर्धीनी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील भव्य असा तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य तपासणी मेळावा घेण्यात आला. या शिबिरात एकूण 700 पेक्षा जास्त रुग्णांची तज्ञांच्या हस्ते तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी डॉ.प्रमोद नरवणे ( जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती),आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीणा देशमुख अधीक्षिका ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर, डॉ. स्वप्नील मालखेडे (तालुका वैद्यकीय अधिकारी नांदगाव खंडेश्वर) अमरावती येथील अस्थिरोग तज्ञ, डॉ अंकुश नवले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीणा देशमुख यांनी केले तर
संचालन देवेंद्र बोके यांनी केले, व तसेच आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील मालखेडे यांनी केले. या शिबिराला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडे गावातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या तपासणी करीता एकच गर्दी केली होती या शिबिरामध्ये नागरिकांच्या वेगवेगळे आरोग्य विषयी तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. हे शिबिर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने घेण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रवीण धारगे, डॉ अभिजीत कपिले, डॉ. सुमित जाधव, डॉ. स्वप्निल लढा, गणेश पिसे, प्रदीप सहारे, सुधीर लोने, पवन शिरभाते, मुकेश पोळकर, प्रीती मकेश्वर,आदींनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला अमरावती येथील हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची चमू यावेळी उपस्थित होती. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांनी आपल्या आरोग्य तपासणी करता एकच गर्दी केली होती.
…………………………………….
यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे प्रथम कार्ड धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद नरवणे यांच्या हस्ते देण्यात
देण्यात आले.
…………………………………….
या शिबिरामध्ये मरणोत्तर ( अवयव) देहदानाचे शपथ पत्र नागरिकांकडून भरून घेण्यात आले त्यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड तसेच नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. प्रवीना देशमुख यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून यावेळी आपले शपथपत्र भरून दिले
……………………………………..