आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.21एप्रिल): – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद आणि राजमाता जिजाऊ महाविद्यालय, घोडेगाव, तालुका-खुलताबाद, जिल्हा-औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ महाविद्यालयात दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी आंतराष्ट्रीय वसुंधरा दिन (World Earth Day) च्या निमित्ताने विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम COVID-19 चे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमातून पाणी टंचाई, मातीची झिज, जंगलतोड, जैवविविधतेचे नुकसान याबद्दल विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी तज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण, कलापथकाचे सांस्कृतिक कार्यक्रम, रली, वृक्षारोपण आदिचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED