राजपिंप्री येथील एका व्यक्तीस पोटात चाकुने वार केल्याचा धक्कादायक प्रकार

🔸गेवराई शहराजवळील धक्कादायक घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.21एप्रिल):-दोन व्यक्तींच्या झालेल्या वादात गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीस चाकुने पोटात भोसकून जखमी केल्याची घटना बुधवार दि.20 रोजी दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील पांढरवाडी फाटा या ठिकाणी घडली.

या बाबद सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील राजपिंप्री येथील साईनाथ शिवाजी मिठे ( वय ३५ वर्ष ) हे दुपारी चारच्या सुमारास गेवराई शहरा जवळ असलेल्या पाढंरवाडी फाट्यावरील सार्थक हॉटेल जवळ होते त्यांचा सोबत अन्य एकजण होते. या दोघांत कोणत्या तरी कारणावरून वाद निर्माण झाला या वादाचे हाणामारी मध्ये रूपांतर होऊन साईनाथ मिठे यांच्या पोटात अन्यात व्यक्तीने चाकू भोसकला यामध्ये मिठे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकरण कोणत्या कारणामुळे झाला हे उद्याप स्पष्ट झाले नाही.

Breaking News, क्राईम खबर , बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED