राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात डांबावे:-पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.21एप्रिल):- मनसे प्रमुख राज ठाकरे सरळ सरळ चिथावणीखोर भाषण देत असून कायदा सुव्यवस्था बाधीत होत आहे, त्यामुळे वेळीच राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात डांबावे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.*

पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, सार्वभौमत्व देशात लोकशाही चा गळा दाबून संविधानाची नीतिमुल्ये पायदळी तुडवलि जात असून कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारून धार्मिक दंगली निर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा मनसुबा वाटतो आहे. राज्यात अशी अराजकता निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजू पाहात आहेत.

पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर असेही म्हणाले की,
कायद्यापेक्षा राज ठाकरे मोठे नाहीत. प्रत्येक्षरित्या दोन समाजात दुही निर्माण करत आहेत. त्यांच्या या कृतिचा फार मोठा फटका राज्याला पडणार आहे. देशासह राज्य आताच कोरोना मुळे आर्थिक दृष्ट्या डबगाइतुन् सावरत असतांना आता जातीय दंगलीचा भार राज्याला आणी समाजाला पेलावणार नाही.

राज ठाकरे यांना बेड्या ठोकून तुरुंगात डांबून ठेवावे. ज्यामुळे त्यांनी धार्मिक दंगली निर्माण होण्यासाठी जे जे कट-कारस्थान रचली आहेत, दौरे, आंदोलने, सभा किंवा हनुमान चालीसा मशीदिसमोर भोंगे लावून म्हणणे आदी प्रकार रद्द होऊन या प्रकरणाला अंकुश् बसेल. आणी त्यांना कायद्यानुसार भाषण बंदी आणावी. असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

शिवाय मुस्लिम बांधवांनी आप-आपल्या मशीदीवर भोंग्यांची पोलीस परवानगी घ्यावी आणी ज्या मशीदी वरील भोंग्यांना पूर्वीपासूनच परवानगी आहे अश्यांनी मा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाचे निर्देश् पाळावेत अश्या सुचना ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी सर्व मशीद व्यवस्थापनास प्रसिद्धी माध्यमांद्वारे केल्या.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED