शेख मोहसीन यांची न्यू हायस्कूल गेवराईच्या सदस्य पदि निवड

    49

    ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

    गेवराई(दि.22एप्रिल):- येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल गेवराई शालेय समितीच्या सदस्यपदी युवा नेते शेख मोहसीन खाजाभाई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ,मा.आ. अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शिफारशीवरून मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या व शैक्षणिक दृष्ट्या अग्रगण्य असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील न्यू हायस्कूल या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीवर सदस्य शेख मोहसीन खाजाभाई यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.शेख मोहसिन हे नेहमी समाजकार्यात अग्रसर असुन सर्व समाज बांधवांना सोबत घेवुन चालत असतात.

    शेख मोहसिन नेहमी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्सान देण्याचे काम करतात.विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्काॅलरशिफ भेटण्यासाठी व प्रवेश भेटण्यासाठी मदत करतात. शेख मोहसिन हे क्रिकेट ,फुटबाॅल,हाॅलीबाॅल प्रेमी आहे.क्रिडाक्षेत्रात विद्यार्थ्यांना मोलाचा मार्गदर्शन करतात. मा.आ.आमरसिंह पंडित यांनी दिलेली जबाबदारी पुर्ण करतील अशि भावना जनतेतुन व्यक्त होत आहे व शेख मोहसिन यांची न्यु हाॅयस्कुल गेवराई च्या सदस्य पदि निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.