नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

🔸विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली पुरस्कारांची घोषणा

🔹नायगाव ता. अध्यक्ष नागेश कल्याण यांच्या प्रयत्नांना यश

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.22एप्रिल):-मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कारांची घोषणा परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका पत्रकार संघाला यंदाचा आदर्श तालुका पुरस्कार घोषीत झाला आहे.सदर पुरस्कार ७ मे रोजी गंगाखेड येथे वितरित होणार आहे.हे वृत्तकळताच नायगाव तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकार्यात आनंदा चे वातावरण पसरले आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील प्रत्येक विभागातील एका तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम… देशमुख यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली आहे. नायगाव, सावंतवाडी, गुहागर, नरखेडा, सिल्लोड, जामखेड, रिसोड, फलटण या तालुका पत्रकार संघांची स्व. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत उत्तम काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कार्याची राज्य पातळीवरून फारशी कोणी दखल घेत नसल्याने पत्रकारांबद्दल एक नकारात्मक दृष्टीकोन बळावत चालला होता. हे टाळण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारया तालुकाआणि जिल्हा संघांना राज्य पातळीवर सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आणि त्यानुसार प्रत्येक पत्रकार संघाच्या ता अध्यक्षांकडून कार्य अहवाल पुस्तिका मागवली .

नायगाव तालुका पत्रकार संघाने विद्यमान जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे जेष्ठ पत्रकार माधव मामा कोकुरले,एस.एम.मुदखेडकर,भूषण पारळकर,राजेश कुलकर्णी,बालाजी नागठाणे,माधव चव्हाण,विकास भुरे,बडुरे सर,बळवंत जाधव,वसंत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली . तालुकाध्यक्ष नागेश कल्याण यांच्या पुढाकारातून सुंदर अशी कार्य अहवाल पुस्तिका तयार केली विभागीय सचिव सह सर्व पदाधिकारी यांना सुपूर्द केली.या कामी ता कार्याध्यक्ष माधव धडेकर,ता सरचिटणीस माधव बैलकवाड, ता उपाध्यक्ष गंगाधर ढवळे,बालाजी माली पाटील,शेख आरिफ,या सह तालुका पदाधिकारी व मांजरम,नरसी,बरबडा, कुंटुर,नायगाव च्या पत्रकार बांधवांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर लढे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले.

या सर्व उपक्रमांची दखल घेवून मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करण्या साठी निवड केली आहे.या यशाबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील यांच्यासह विभागीय सचिव प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, सरचिटणीस सुभाष लोणे, जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे,दिगबर सावन्त,सहसचिव अनिल धमने,राम तरटे,आदींनी नायगाव तालुका संघाचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED