मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

    42

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(29 जून)-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत . खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला आहे.
    मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली, त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनं येऊन धडकली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत .
    खोपोली पोलीस आणि ‘अपघातग्रसतांच्या मदतीसाठी’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे . लॉक डाउनमुळे या मार्गावरची वर्दळ खूपच कमी झाली होती, त्यामुळे अपघातदेखील जवळपास थांबले होते . परंतु दुर्दैवाने आज हा अपघात झाला .