मांडवा-सांडवा शिवारातील हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24एप्रिल):-तालुक्यातील मांडवा -सांडवा शिवारातील शिवराज टिकोरे यांच्या शेताच्या बाजुला गेल्या १३वर्षे पासून जागृत हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी नविन मुर्तीची स्थापना २७ एप्रिल २०२२ रोजी करावयाचे आहे.

हे मंदिर मांडवा या गावापासून १ कि.मी.अंतरावर मांडवा – सांडवा निसर्गरम्य अशा घाट शिवारात आहे. शिवराज टिकोरे या शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला असून या मंदिराची उभारणी लोकसहभागातून करण्यात आली आहे.या मंदिराचे अपूर्ण असलेले बांधकाम मांडवा व सांडवा येथील ग्रामस्थांनी पुर्ण करण्यासाठी व सुसज्य मंदिर उभारणीसाठी समस्त ग्रामस्थ वासियांनी मदतीचे आवाहन केले होते .
हे मंदिराचे बांधकाम पूर्ण करून या ठिकाणी सुरक्षा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने समस्त ग्राम वासियांनी या मंदिरासाठी संपूर्ण बांधकाम व सुरक्षासहित कामाचा विडा उचलला होता .त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा होता . ईत्यादी कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील भाविकांनी सढळ हाताने मदत केली.

ह्या जागृत हनुमान मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना २७ एप्रिल रोजी करण्यात येत असून २६ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ८ ते १० वाजेपर्यंत हरिनाम जागर ,भजन होईल .यासाठी ह.भ.प.खंडुजी महाराज सांडवेकर उपस्थित राहील .
२७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता काकडा आरती होईल. त्यानंतर.७ वाजता महारुद्र अभिषेक व होम होईल. अभिषेकाचे यजमान म्हणून दत्तराव पुलाते पोलिस पाटील मांडवा व संजय सांडवकर पोलीस पाटील सांडवा हे उपस्थित राहतील.सकाळी ठिक ९ वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल व भजनी मंडळ सांडवा यांचे भजन होईल.त्यानंतर सकाळी १० वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात येईल .

ज्या भाविकांना मंदिराच्या उर्वरित कार्यासाठी व महाप्रसादाला देणगी द्यायची असेल त्यांनी देणगी देण्यासाठी संपर्क म्हणून पवन राऊत पानपट्टी मांडवा ७७६७९८५११८, विनायक पांडे सांडवा ९६०७४८०६१५, संतोष जाधव ९५५२०३१०७४, महादेव डोळस ९०७५६३१९६५, फोन पे करण्यासाठी संपर्क साहेबराव चव्हाण पुसद ९४२१७७४४७७, शिवराज टिकोरे ९६५७८२४६४२, ग्राम परिवर्तन समितीचे उपाध्यक्ष अंकुश घावस ७७७६८०५१६२, बाळासाहेब ढोले पत्रकार ७८७५१५७८५५ यांच्याशी संपर्क साधावा. समस्त भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मांडवा- सांडवा येथील ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.