डॉ. आंबेडकर पुतळा विटंबणा प्रकरणी खा. श्रुंगारेंवर कार्यवाही व्हावी.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

30

(राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात आंबेडकर प्रेमींनी गुन्हा नोंदवावा)

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.24एप्रिल):-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लातूर येथे बसविण्यात आला असून भाजपा प्रणित खा. सुधाकर शृंगारे वा शिल्पकार अक्षय यांनी व्यंग समिती साकरून विटंबणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी महाराष्ट् राज्य पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक वा लातूर जिल्हाधिकारी आणी अन्य पोलीस मान्यवरांना दिलेल्या तक्रारीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (टी. एम कांबळे गट) राष्ट्रीय महासचिंव् पॅन्थर डॉ. राजन माकणीकर म्हणाले की, लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 72 फुट पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्या पुतळ्याचे अनावंरन करण्यात आले तो पुतळा बाबासाहेबांचे व्यंग करण्यात येऊन विटंबणा करण्यात आलि आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्यंगात्मक उभारण्यात आला असून आंबेडकरी प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.बाबासाहेबांचे रूप अप्रतिम आणी देखणे असतांना शिल्पकार अक्षय व लातूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार सुधाकर श्रुगरे यांनी विद्रुप पुतळा उभारून पुतळ्याची विटंबणा केली आहे आहे.

सदरचा प्रकार निषेधार्ह असून आंबेडकरी अनुयायींना सहन ना होणारा आहे. संबंध महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातिल पोलीस ठाण्यात यांच्या विरुद्ध विटंबणेचा तक्रारी अर्ज देवुन् गुन्हे नोंदवण्याचे आवाहन ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी आंबेडकर प्रेमिन्ना केले आहे.

डॉ. माकणीकर असेही म्हणाले की, सदरचा प्रकार माफी योग्य नाही.याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर रूप साकारणारा 72 फुट ब्रांझ धातुचा लोकवर्गणीतून नवा पुतळा उभारावा. पण तो पुतळा सावकाश वेळ घेऊन सुंदर बसवावा.

खा. सुधाकर शृंगारे आणी शिल्पकार अक्षय हे मागासवर्गीय प्रवृगातील असल्यामुळे पुतळा विटंबणा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच पुतळा समिती मध्ये संवर्णं सभासद असल्यास त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवावा. अशी मागणी पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर यांनी केली आहे.