गेवराईत अज्ञाताकडून भररस्त्यात प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन; बसेसवर दगडफेक

    37

    ✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

    गेवराई(दि.24एप्रिल):- शहरात अज्ञात समाजकंटकांकडून भररस्त्यात प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर रस्त्यावरून जाणाऱ्या दोन एसटी बसेसवर देखील दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना गेवराई शहरातील दसरा मैदान परिसरामध्ये रात्री 8 ते 9 च्या दरम्यान घडली आहे. गेवराई शहरातील दसरा मैदानाजवळ रात्री अज्ञातांनी रस्त्यावर टायर जाळले आहेत.

    तर त्यानंतर सोलापूरहुन गेवराईकडे आलेल्या एसटी बस क्र. MH.20 BL.2346 व बीड ते गेवराई एसटी क्र. MH.20.BL.O2O1 या बसेस वर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही बसच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान या घटनेने गेवराई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नेमकं कोणी? कशासाठी? कोणाचा पुतळा जाळला? आणि बसेसवर दगडफेक का केली ? याचा तपास गेवराई पोलिस करत आहेत. मात्र सध्या रस्त्यावर पोलिसांचा फौजफाटा असून यामागे नेमकं कोण आहेत ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.