पत्रकारांनी आपल्या समस्या PSVPSS संघटनेकडे मांडाव्यात

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांचे किनवट बैठकीत आवाहन

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

किनवट,नांदेड(दि.25एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणीची महत्त्वपुर्ण बैठक दिनांक २४ एप्रिल,२०२२ रोजी “आज की न्यूज” कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत किनवट तालुका कार्यकारणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न संघटनेमार्फत होत असून आपल्या काही समस्या असतील तर त्या जिल्हा कार्यकारिणीकडे किंवा संस्थापक अध्यक्ष श्री डी. टी. आंबेगावे सर यांच्याकडे मांडाव्यात त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष श्री संजीवकुमार गायकवाड यांनी किनवट येथील बैठकीत दिले.

तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, किनवट टीमच्या वतीने विविध विधायक कार्यक्रम राबवून समाजसेवा कार्यात अग्रेसर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, किनवटच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसिर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष शेख अतिफ, सहसचिव प्रणय कोवे, तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकाते, तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश परचाके, चंद्रकांत कागणे, प्रा.जोगदंड, उद्धवराव रामतीर्थकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED