✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०
?संविधानिक विचार-मूल्यांची पेरणी करत चिचोंडीत झाला देशभक्ती आंबेडकरी प्रबोधन गीतांचा जल्लोष
चिचोंडी बु(ता.येवला)(दि.26एप्रिल):-विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने भीमनगर चिचोंडी बु येथें शहीद मेजर नारायण भाऊ मढवई मंचावर प्रबुद्ध लोककला विद्यापीठ निर्मित शरद शेजवळ सर प्रस्तुत राजा शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर आधारित सामाजिक प्रबोधनात्मक गीतांचा आंबेडकरी शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शहीद मेजर नारायण भाऊ मढवई यांचे वडील वीरपिता निवृत्तीदादा मढवई आणि बंधू बाळूअण्णा मढवई यांच्या हस्ते
तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि शहीद मेजर नारायणभाऊ मढवई यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शहीद मेजर नारायणभाऊ यांना मानवंदना देताना गायक शरद शेजवळ सर,ऍड आरतीताई खरात,जितेंद्र पाटील यांनी दिल दिया है,जान भी देंगे, ए वतन तेरे लिए या देशभक्ती गीताने आंबेडकरी शाहिरी जलसास सुरुवात झाली.
त्यानंतर लोककवी वामनदादा कर्डक यांची रचना शरद शेजवळ सर यांनी *तुझ्या हाती तूप आल,तुझ्या हाती साय पण लुटली जाते येथे बहिण कधी लुटली जाते माय….. पण समाजाचे काय रे गड्या……समाजाचे काय* सद्याच्या सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचे काम या गीतातून करण्यात आले. तर बाबासाहेबांची लेखणी कशी होती हे गीतातून मांडताना *जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी* या गीतातून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख गायिका ऍड आरतीताई खरात यांनी करून दिली.महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान आणि त्यामुळे आजच्या मुलींची किती प्रगती झाली या आशयाचे गीत रचना सादर करण्यात आली.
फुल्यांनी जर शिकवले नसते सावित्रीबाईला…..तर असे सुखाचे दिवस आलेच नसते हर एक बाईला* या गीतातून गायक शरद शेजवळ सर यांनी महात्मा फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य किती अनन्यसाधारण आहेत हे पटवून दिले.त्याच बरोबर या देशात शिवराय आणि भीमराय यांनी केलेल्या कार्याची ओळख करून देताना या दोन्हीही महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारे गीत सादर झाले *दोनच राजे इथे जन्मले त्या कोकण पुण्यभूमीवर….**एक त्या रायगडावर….. एक त्या चवदार तळ्यावर* या गीतातून या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडण्यात आला.रमाईने बाबासाहेबाना संपूर्ण आयुष्यभर साथ दिली आणि कोणतीही कुणकुण न करता संसार सांभाळला.रमाईच्या जीवन प्रवास *माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान* आणि *रमामाईला घेऊन जोडीत भीम बसला व रथाच्या जोडीला*, *नांदन नांदन माझ्या रमाच नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण* ही गीत रचना ऍड आरतीताई खरात यांनी सादर केल्या.
त्याच बरोबर *राजा राणीच्या जोडीला*, *गावामध्ये गाव आहे ते महू गाव येथे जन्मले भीमराव* या गीत रचना जितेंद्र पाटील यांनी सादर केले. त्याच बरोबर *माझी आज्जी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर* ही गीत रचना रवींद्र गोंडाअंबे यांनी सादर केली.त्याच बरोबर गावातील बाल गायिका साक्षि केशव गुंजाळ हिने *कुहू कुहू मंजुळ वाणी,भीमा तुझी मंजुळ वाणी* ही गीत रचना सादर केली तर बाल गायक मनोज बाळू गुंजाळ याने *जागं असावं शिव भिवाच पिल्लू जागं असावं* आणि प्रेम सोनवणे याने *जसा गुलाब फुलतो या त्या सुगंधी**जाईला,भीम आवडीने* *बोले रामू रामू रमाईला* या गीत रचनेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
अशाप्रकारे एका पेक्षा एक अनेक प्रबोधनात्मक गीत रचना सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक गीतांच्या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या गीतामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले यावेळी विजय भोंडगे (ढोलकी) अक्षय भोंडगे (तालवाद्य) सतीश सोळसे (की बोर्ड) सिध्दार्थ गुंजाळ आणि संकेत गुंजाळ यांची साथ संगत लाभली.यावेळी सर्व कलावंतांचे शाल, गुलाब पुष्प आणि बाबासाहेबांचा ग्रंथ देऊन उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेवटी *जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा…….वो भारत देश है मेरा* या गीतानंतर शहीद मेजर नारायणभाऊ यांना मूक श्रद्धांजली देऊन शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ सर यांनी केले यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.