✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.26एप्रिल):- पासून अंदाजे ५ किलोमीटर अंतरावर मुंगोली कोळशा भरण्याकरिता जाणारा ट्रक वर्धा नदीत भरधाव वेगात निरंतर सुटल्याने वाहन नदीत पडले असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची साखळी सुरू आहे. या अपघातांचे एकमेव कारण अतिवेग असल्याचे सांगितले जात आहे. २४ एप्रिल रविवार रात्री रोजी रस्ता अपघात झाला होता. त्यात ट्रक वर्धा नदीत पडला.वाहन चालक भारत टेकाम (४५) हा जागीच ठार झाला. पोलीस घटनास्थळी हजर आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास एक वाहन नेहमीप्रमाणे मुंगोलीकडे जात होते. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन मुंगोली पुलावरून वर्धा नदीत पडले. वाहन चालक भारत टेकाम ४५ हा जागीच ठार झाला. मात्र बरेच तास उलटूनही ट्रक वाहन चालक मृतदेह बाहेर काढू शकलेला नाही. याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दिवसेंदिवस मुंगोली पुलावरून अनेक अपघात होऊन नाहक बळी गेले आहे तर काही वाहन वर्धा नदीत कोसळून चालक, वाहकाच्या बळी गेला तरी या पुलाकडे वारंमवार तेथून येनार,जाणार व परिसरातील नागरिक चर्चा करीत,असे वारंमवार पुलाकडे वेकोली दुर्लक्ष करीत आहे,हे वृत्त लिहेपर्यंत अधिक माहिती मिळालेली नाही.