मौजे बिबी येथे बालक ग्राम सभेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

26

✒️मनोहर गोरगल्ले(खेड/राजगुरुनगर विशेष प्रतिनिधी)

खेड(दि.26एप्रिल):- ग्रामपंचायत मौजे बिबी तालुका खेड जिल्हा पुणे येथे बालक ग्राम सभा आयोजित केली होती, सदर ग्राम सभेत ग्रामपंचायत बिबी तालुका खेड जिल्हा पुणे मार्फत अंगणवाडी, जि. प. प्रा.शाळा गुंडाळ वाडी, जि.प.प्रा.शाळा बुरसेवाडी, जि.प.प्रा.शाळा शंभो ठाकरवाडी, यांना शाळांना आवश्यक असणारे कपाटे, प्रिंटर, खुर्च्या, वजन काटे व इत्यादी साहित्य देण्यात आले.

यावेळी सरपंच सुजाता भोर, उपसरपंच सतीश जैद, मा. सरपंच आण्णा गुंडाळ, सदस्य दिपक कालेकर, रवी बुरसे, संगीता तनपुरे, मुख्याध्यापक मीरा मिंडे, हरिभाऊ पोटे,शमा घोडके,सुवर्णा गोइंलकर,वनिता कोल्हे मॅडम, ग्रामसेवक कल्याणी राजगुरू शिपाई हरी भांगे व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.