कृष्णापुर(लहान तांडा) येथील पांदण रस्त्याच्या अतिक्रमणासाठी ग्रामस्थांचे आमदार तथा उपविभागीय अधिकाऱ्यांना साकडे

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27एप्रिल):-कृष्णापुर नाल्यापासून (लहान तांडा) ते उमरखेड मेट डांबरी रस्त्यापर्यंत पांदन रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी मागील अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु ती शासन दरबारी धुळखात पडली आहे. हा रस्ता नाल्यामुळे पावसाळ्यात प्रचंड हाल होतात त्यामुळे शेतीचे कामे करणे अवघड झाले आहे.याचा प्रचंड त्रास ग्रामस्थाला सोसावा लागत आहे.

सदर रस्त्यालगत मानवी वस्ती असल्यामुळे दळणवळण ह्याच रस्त्याने होते.रस्ता नसल्यामुळे त्याचे अनेक दुषपरिणाम भोगावे लागत आहे.

वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे जिवित हानी सुध्दा झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता आहे.

त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे आहे. सदर आवेदनाव्दारे विनंती करण्यात येते की, या रस्त्याच्या नाल्या खुल्या करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे.

सदर पांदण रस्त्याचे अजुबाजूच्या रस्त्याचे अतिक्रमण काढणे आवश्यक आहे.

त्यासाठी संबधीत यंत्रणेला आदेशीत करून अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला विनाविलंब सुरूवात करावी. पावसाळा अगदी तोंडावर आला.

रस्ता न झाल्यास पेरणी करणे अवघड आहे. याबाबत विधानसभा क्षेत्राचे आमदार नामदेव ससाने व प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊन सुध्दा चालढकलपणा होत आहे.

तरी,लवकरात लवकर अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी. व रस्त्याचे काम त्वरीत व्हावे अन्यथा सर्वजण दि. 01/05/2022 वार रविवार या रोजी सकाळी 11वा. तहसिल कार्यालयावर अमरण उपोषणाला बसेल. त्यामुळे होण्याऱ्या दुष्परिणामाची जबाबदारी पुर्णतः प्रशासनाची राहील.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED