राज ठाकरेचा बापही मस्जिद वरील भोंगा काढू शकत नाही – दादासाहेब शेळके (प्रमुख भीम टायगर सेना)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो.9823995466

यवतमाळ(दि.26 एप्रिल):-आपल्या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचे राज्य असून आपला देश भारतीय संविधाना नुसार चालत असतो.

तो कोणाच्याही ईशारावर चालत नाही‌.भारतीय संविधानाने भाग 3 Write to Freedom of Religion धर्म स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 25, 26, 27, 28 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माची उपासना व आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा व ई.अधिकार दिलेला आहे.

दि‌.12 एप्रिल 2022 रोजी राज ठाकरे यांनी ठाणे, मुंबईत “उत्तर सभा” घेऊन त्यात इशारा दिला की मस्जिद वरील भोंगे 3 मे 2020 ह्या तारखे पर्यंत काढा असा धमकीवजा इशारा दिलेला आहे. मुळातच आपल्या संपत जाणाऱ्या पक्षाला जिवंत करण्यासाठी असे वक्तव्य करून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसतोय.

सरड्या सारखा नेहमी रंग बदलणार्या राज ठाकरे यांनी मस्जिद वरील भोंगे काढणे संदर्भात सुप्रीम कोर्टाचा हवाला दिलेला आहे.पण राज ठाकरेंना मला सांगायचे आहे.

18 जुलै 2005 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चुकीची माहिती देऊ नका. मुळातच सुप्रीम कोर्टाने मस्जिद वरील भोंगे काढण्या संदर्भात तो निर्णय दिलेला नसून सर्वच धर्माच्या प्रार्थना स्थळावरील लाऊडस्पिकरच्या आवाजा संदर्भात तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. व त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात असे कुठेही म्हटले नाही की मस्जिद वरील लाऊडस्पिकर काढा.

उलट प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळावरील लाउसस्पीकरच्या संदर्भात आवाजाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली असून भारतीय संविधान भाग 5 संघराज्य आर्टिकल 141 व 142 नुसार सर्वच धर्माच्या प्रार्थना स्तरावरील लाऊडस्पीकर संदर्भात आवाजाची मर्यादा संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्व देशाला लागू असतो.

ती निर्णय पुढीलप्रमाणे
1) शांतता क्षेत्रे: दिवसा 50 रात्री 40 डेसिबल
2) निवासी क्षेत्र: दिवसा 55 रात्री 45 डेसिबल
3) व्यवसाय क्षेत्रे: दिवसा 65 तर रात्री 55 डेसिबल
4) औद्योगिक क्षेत्रे: दिवसा 75 तर रात्री 70 डेसिबल अशी आवाजाची मर्यादा ठरवुन दिली असून शाळा,न्यायालय, दवाखाने अशा ठिकाणी 100 मीटर पर्यंत परिसरात लाऊडस्पीकर वर सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे.

असे सर्व असताना मुस्लिम द्वेषाने जर्जर झालेल्या राज ठाकरे यांनी आपली राजकीय दुकानदारी सुरू करण्यासाठी मुस्लिम समाजाला टार्गेट करणे सुरू केले असून असे आव्हान देणार्‍यांना आत्तापर्यंत मुस्लिम समाज पुरून उरलेला आहे.

आपल्या देशात भारतीय संविधानाचा राज्य असून राज ठाकरे यांच्या बापाचं राज्य नाही.त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशार्या ना मुस्लिम समाज कधीच भीक घालणार नाही.

मुस्लिम समाज नेहमी हा भारतीय संविधानाच्या बाजूने असून तो भारतीय संविधान मानणारा आहे.

त्यामुळे मुस्लीम समाजाची बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे. राज ठाकरे शी नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा मज्जिद वरील लाउडस्पीकर काढा हा इशारा असंविधानिक असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो. तसेच राज ठाकरे यांचा इशारा हा मुस्लिम धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने, उपासस्थानाचे नुकसान करणे अगर अपवित्र करणे व मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने केलेला दिसतो.

तसेच धर्मा धर्मा दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे,धर्माच्या कारणावरून दोन गटात शत्रुत्व वाढवुन आपला हेतू साध्य करणे हा दिसतो.

त्यामुळे मी भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की शासनाने राज ठाकरे यांच्यावर तात्काळ भारतीय दंड विधान 153,153अ,295,295अ व 298 नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी जेणेकरून शांत व धर्मनिरपेक्ष असलेल्या महाराष्ट्राला गालबोट लागणार नाही.

जर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर भिम टायगर सेना लवकरच मुस्लिम बांधवाना सोबत घेऊन संविधानिक आंदोलन करेल तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय मस्जिद वरील भोंगा काढण्या संदर्भात नसल्यामुळे राज ठाकरेच काय राज ठाकरे चा बाप जरी आला तरी मस्जिद वरील भोंगा काढणे तर दूरच भोंग्याला साधा हातही लावू शकणार नाही.

आणि जर मस्जिद वरील भोंग्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर ते हात शाबूत राहतील काय याचा विचारही मस्जिद वरील भोंग्याना हात लावणार्यानी करावा.

एवठे मात्र नक्की
जयभीम,जयमीम,जयभारत,जय संविधान…! अशी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या जिल्हाप्रतिनिधी ला बोलतांना देण्यात आली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED