कॅश लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इसमाना 12 तासात पकडण्यात ब्रम्हपुरी पोलीस यशस्वी

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 26एप्रिल): शहरातील देलनावाडी येथील मदरपेठ स्कुलच्या मागील रोडवर नेहमीप्रमाणे कॅश जमा करून घेऊन जाणाऱ्या इसमाला मीरची पावडर टाकून व मारहाण करून लूटणाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ब्रम्हपूरी पोलीसांनी 12 तासाच्या आत पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

तक्रारदार संजय देवाजी कुलसंगे रा. ब्रम्हपूरी यांचा कॅश गोळा करून बँकेत जमा करण्याचे काम असून नेहमीप्रमाणे अॅमेझॉन सेंटर येथून दि. 25/04/2022 चे सकाळी 10.00 वा. दरम्यान 1,63,000 रू. गोळा करून आपले मोटारसायकलने जात असतांना मदरपेठ स्कुलच्या मागील रोडवर त्यांना 2 इसमांनी अडवून त्यांच्या डोळयात मीरची पावडर टाकून व हाताला मारहाण करून त्यांचेकडील कॅश असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी प्रतिकार करून आरडाओरड करताच बाजूला काम करीत असलेले मजूर धावत येताच मागे मोटारसायकल घेऊन उभा असलेला आरोपी याने दोघांना घेऊन तिथून पळ काढला. संजय देवाजी कुलसंगे यांचे रीपोर्ट पो.स्टे.ला कलम 394 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचा स्टॉफ त्वरीत घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींच्या शोधकामी शहरात चहूबाजूने हालचालीस सुरूवात केली. गोपनीय व तांत्रिक मदत घेऊन त्यातील एक आरोपी अजय अंबादास निहाटे रा. नवेगाव याचा शोध घेतला असता तो मालडोंगरी फाटयाजवळ मिळून आला त्याचेकडून दुसरा आरोपी शिवशांत उर्फ भिस्सू दामोधर भूरे, रा हनुमान नगर ब्रम्हपूरी याचे नाव कळल्यावर त्याचेही शोधकामी पथक रवाना असून तो रात्री हनुमान नगर भागात लपतांनी सापडला. तसेच त्यांच्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक असून त्यासही ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी अटक असून त्यांना जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदरची कामगिरी मा. मिलींद शिंदे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ब्रम्हपूरी, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, सपोउनी / संजय गौरकार, पोहवा/ नरेश रामटेके, नापो योगेश शिवनकर, नापो / मुकेश गजबे, पोशी / संदेश देवगडे यांनी केली.

नागरीकांना आवाहन करण्यात येते कि आपण घराबाहेर पडतानी जास्त रोख रक्कम जवळ न बाळगता ऑनलाईन व्यवहार करण्यास प्राधान्य दयावे. तसेच घरात सुध्दा आस्त रोख रक्कम व मौल्यवान दागिने न ठेवता सुरक्षित ठेवावे.