


प्रभु श्री राम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या (त्वरितापूर) तलवाडा येथील त्वरिता देवीची यात्रा चैत्र पोर्णिमापासून आठ दिवससानी म्हणजे अष्टमीच्या दिवसापासुन भरते दिनांक २३/४/२०२२ एप्रिलपासून सुरू झाली असून. एक महिनाभर चालणारी ही यात्रा बीड जिल्ह्यात सह सर्व मराठवाड्यात प्रसिद्ध आहे . चैत्रशुद्ध पौर्णिमेस देवीला तेल लागते , व ते अष्टमीच्या दिवशी उतरविले जाते . अशी येथे प्रथा आहे . याच दिवसापासून यात्रा भरण्यास प्रारंभ होतो . अष्टमीच्या दिवशी बोललेल्या नवसाची पूर्तता व्हावी म्हणून अनेकजण बगाडे घेतात , ही बगाडे वाजतगाजत देवीपर्यंत नेली जातात . बगाडे पाहण्यासाठी खूप गर्दी होते , त्वरिता देवी व आई तुळजाभवानी आशी दोन मंदिरे या ठिकाणी आहेत . त्वरिता देवीचे मंदिर आणेकांच्या श्रद्धेचे व अस्मितेचे प्रतीक बनलेले आहे . दूरवरचे भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्वरिता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कृपा आशीर्वादाची मनो कामना करतात , बोललेला नवस फेडण्यासाठी येथे बकऱ्यांचा बळी दिला जातो ही प्रथा फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे . महिनाभराच्या या कालवधीत हजारो भाविक आपला नवस पूर्ण करून देवीला प्रसाद चडवितात , नवसाला पावणारी देवी म्हणून त्वरिता देवी देवस्थान भक्तांचे अढळ श्रद्धास्थान बनलेले आहे . देवीची महती व भक्तांची श्रद्धा यामुळे यात्रेला येणाऱ्या यात्रिकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे . तब्बल महिनाभर चालणारा हा उत्सव शांतेत पार पाडण्यासाठी पोलिस विभाग, मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्ते, तसेच विश्वस्त मंडळ व सहकारी अथक परिश्रम घेऊन भक्तांची सेवा मोठ्या तन्मयतेने करतता .
डोंगरमाथ्याशी असलेले जगदंबाचे ( त्वरिता देवीचे ) मंदिर , भव्य प्रवेशद्वार व समोरील चार दीपमाळा भाविकांचे लक्ष वेधून घेतात . हे मंदिर फार पुरातन असून ते अंदाजे ३०० ते ३७० वर्षांपूर्वी बांधलेले असावे . असा अंदाज आहे . कारण मंदिरासमोरील दीपमाळावर शिलालेख कोरलेले असून त्यावर इ . स . १३०० फसली अशी ओळ लिहिलेली दिसते . यावरून हे मंदिर इसवी सन १६०० ते १६ च्या दरम्यानचे असावे असा अंदाज आहे . या मंदिराविषय माहिती येथे उपलब्ध नाही . परंतु पुरातत्त्व संशोधन खात्याने याचा शेध लावला तर निश्चितचपणे पूर्वीची कागदपत्रे उपलब्ध होतील व त्वरिता देवीच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडेल . हे मंदिर फार पुरातन व अतिभव्यदिव्य असून या मंदिराचा कार्यभार इसवीसन १ ९ ७ ९ पासून विश्वस् मंडळाद्वारे चालविला जात आहे . या मंडळाचे अध्यक्ष व सदस्य अत्यंत प्रभावीपणे मंदिराचा कार्यभार ” सांभाळत आहेत . त्यांनी अनेक सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध • केल्या आहेत . मंदिरावर भाविकाना जाणे सोयीचे व्हावे म्हणून विश्वस्त मंडळाने आकर्षक आश्या पाय-याचे बांधकाम केलेले आहे . तसेच या देवीच्या पायथ्याशी आईतुळजाभवानीचे भव्यदिव्य व आकर्षक असे मंदिर उभारले आहे . भाविकांना ही • मंदिराचे भव्य प्रवेशद्वार व त्याच्यावरती नगारखान्यासाठी तिन कमानी असलेली माडी व दोन्ही मंदिरे दूरवरून आकर्षित करतात . दीपमाळासोर असलेले कमानी असलेली माडी भाविकाचे लक्ष चटकन् वेधून घेतात . देवीचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाताना अत्यंत लहान असा चिंचोळा भाग असून मंदिरात प्रवेश करतांना भाविकांना दोन वेळेस खाली वाकून जावे लागते . आतमध्ये तिन फूट उंचीचा चबुतरा असून त्यावर देवीची काळ्या पाषाणाची चतुर्भुजाकृती मूर्ती आहे . या देवीच्या हातात गदा , पद्म , शंख चक्र , अशी चार आयुधे आहेत . या वरून या देवीचा अवतार म्हणजेच विष्णु नारायण अवतार आहे असे म्हटले जाते . परंतु देवीच्या आरतीमध्ये मात्र देवीचे खेचरू असे नाव अहे . ज्या वेळी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करून देवीची स्थापना केली होती . त्यावेळेस ब्रह्मदेवाने या देवीचे खेचरी असे नाव ‘ ठेवलेले आहे .
परंतु तलवाडा या गावचे पुराणकालीन नाव त्वरितापूर असे असल्यामुळे या देवीला त्वरिपुरी निवासिन म्हणून संबोधलेजाऊं लागले व तद्गतर या देवीचे नाव त्वरिता देवी झाले . या नावाचा उल्लेख दीपमाळावरील शिला लेखात आढळून येतो म्हणून या देवीला त्वरिता देवी म्हणून देखील ओळखतात . परंतु या देवीचे खरे नाव खेचरी असे आहे . त्वरितादेवीचे दर्शन घेतल्यानंतर डोंगरावर एका लिंबाच्या झाडाखाली मैहबुब सुबहानी दर्गा आहे. या दर्गाचे देखील सर्व जाती धर्माचे लोक भक्ती भावाने दर्शन घेतात या ठिकाणी सर्व धर्म समभावांचे दर्शन होते . संशोधकांच्या प्रतीक्षेत भुयार त्वरिता देवी व महेबूब सुबानी दर्गाच्या पूर्वेस एक भुयार असून या भुयारामध्ये अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे स्थान आहे . या ठिकाणी देखील भाविक या देवीचे दर्शन व भुयार पाहण्यासाठी गर्दी करतात . या भुयारांची उंची साधारण तीन फूट एवढी आहे . भुयारामध्ये प्रवेश करताना खाली वाकून आत जावे लागते . गेवराईजवळील पालख्या डोंगरावर हे भुयार निघालेले आहे आसे जुने जानकार म्हणतात . जर याचा शोध घेण्यांचा प्रयत्न केला तर निश्चितपणे प्रकाश पडेल व भुयारी संबंधीची माहिती उपलब्ध होईल . हे भुयार संशोधकांना एक आव्हान आहे.
✒️संकलन:-राऊत लक्ष्मण तलवाडा




