मांडवा येथील जि. प. मराठी शाळेत अंकुर सीड्सच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27एप्रिल):-तालुक्यातील पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या मांडवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या उपक्रमाच्या अंतर्गत अंकुर सीड्स तालुका प्रतिनिधी विनायक ढोणे यांच्या पुढाकाराने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अल्का ढोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड, मुख्याध्यापका वृंदा दिगलवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद आडे, उपाध्यक्ष स्वाती ढोले हे उपस्थित होते .यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा शाळेतील इयत्ता ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आला .

अंकुर सीड्स जिल्हा विक्री प्रतिनिधी संतोष गुंजकर, अंकुर सीड्स तालुका विक्री प्रतिनिधी विनायक ढोणे,शिक्षक अजय अनासने,विनोद तायडे, कैलाश भरगाडे, राखी जयस्वाल, वैशाली रणमले, विक्रांती मस्के, वैशाली बोपिंलवार, कैलास राठोड,रमेश ढोले,गजानन राठोड, गजानन आबाळे,धम्मदिप ढोले, विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होते .या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाने ,सर्व शिक्षकवृंदानी व गावकरी मंडळांनी अंकुर सीडस विक्रेतेचे धन्यवाद मानले.