बनावट लग्न करून फसवणारी नवरी अखेर गेवराई पोलिसांच्या ताब्यात

🔸तळणेवाडी येथील एका युवकाला बनावट लग्न करून केली होती फसवणूक

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.27एप्रिल):- जिल्ह्यातील तळणेवाडी येथील एका युवकाला बनावट लग्न करून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यातील मुख्य सुत्रधाराला व बनावट मामा असणाऱ्यांना यापूर्वीच अटक केल्यानंतर यातील नवरी व तिच्या आईला आज (दि.२६) मंगळवारी गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

नवरी रेखा बाळू चौधरी व तिची आई सुनिता चौधरी दोघी राहणार जाधववाडी सिडको औरंगाबाद असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचीं नावे आहेत. तालुक्यातील तळणेवाडी येथील बनावट लग्न लाऊन दोन लाखांला गंडा घातल्या प्रकरणात नववधू तिचे नातेवाईक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार रामकिशन जगन्नाथ तापडीया रा.सालवडगावं ता.शेवगावं जिल्हा अहमदनगर व नवरी मुलीचा मामा म्हणून मिरवणारा विठ्ठल किशनराव पवार राहणार औरंगाबाद यांना आधी अटक करण्यात आली होती. आता नवरी रेखा बाळु चौधरी राहणार जाधववाडी औरंगाबाद सिडको हि गेवराई पोलिसांनी जाधववाडी सिडको औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार,सहा पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादेज सिद्दीकी, सुरेश पारधी, नवनाथ गोरे, शेखर हिंगावार, ज्योती सांळुके यांनी केली. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED