मांडवा-सांडवा शिवारातील हनुमान मंदिरात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28एप्रिल):- तालुक्यातील मांडवा -सांडवा शिवारात जागृत हनुमान मंदिर आहे. हे मंदिर मांडवा या गावापासून १ कि.मी. अंतरावर मांडवा -सांडवा निसर्गरम्य अशा घाट शिवारात शिवराज टिकोरे या शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजुला गेल्या १३ वर्षे पासून जागृत हनुमान मंदिर आहे. या मंदिराची उभारणी लोकसहभागातून करण्यात आली आहे. या ठिकाणी नविन मुर्तीची स्थापना दि.२७ एप्रिल २०२२रोजी करण्यात आली .

दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ८ ते १० वाजेपर्यंत हरिनाम जागर ,भजन ह.भ.प.खंडुजी महाराज सांडवेकर यांच्या उपस्थित झाले .दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता काकडा आरती झाली . त्यानंतर.७ वाजता महारुद्र अभिषेक व होम झाला. या अभिषेकाचे यजमान म्हणून दत्तराव पुलाते पोलिस पाटील मांडवा व संजय सांडवकर पोलीस पाटील सांडवा हे उपस्थित होते .

सकाळी ठिक ९ वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना ह.भ.प.दिनकर गुरू वाकोडीकर दत्त मंदिर पुसद यांच्या हस्ते व सुधाकर गुरु यांच्या उपस्थित करण्यात आली व माऊली मुंगसाजी महाराज भजनी मंडळ सांडवा यांचे भजन झाले.त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली .

यावेळी श्री. समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ मांडवा, वैष्णवी भजनी मंडळ सांडवा, माऊली मुंगसाजी महाराज भजनी मंडळ सांडवा , नारायण पुलाते, मनोज रामधनी, मनीष राठोड ,परमेश्वर विश्वकर्मा ,राजेश चंदेल ,सचिन चव्हाण, राम जाधव , हरिभाऊ झाडे , अजय उतळे पुसद , महादेव डोळस ,कैलास साखरे ,सुधाकर चव्हाण,साहेबराव चव्हाण ,शिवराज टिकोरे,सटवा दलसिंगारे, रंगा धीरे, प्रसाद गादेवार तसेच सांडवा -मांडवा येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते