देशातील धार्मिक कट्टरतेचा बीमोड करणारा एकमेव विचार म्हणजे बुद्ध धम्म होय- प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे

    41

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.28एप्रिल):-बौद्ध समाज इंदिरा आवास रान बोथली यांच्या सौजन्याने पंचशील बुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा नुकताच रानबोथली या ठिकाणी पार पडला.या विहाराच्या उद्घाटनासाठी उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे कार्यरत समाजशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. स्निग्धा राजेश कांबळे या उपस्थित होत्या. तर उद्घाटक म्हणून नगरपरिषद ब्रह्मपुरी चे उपाध्यक्ष श्री. अशोक रामटेके हे उपस्थित होते.

    बौध्द समाज रानबोथली द्वारा निर्मित बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी आलेल्या प्रा.डॉ. स्निग्धा कांबळे यांनी बुद्धांच्या मानव कल्याणाच्या मार्गाचा परिचय आपल्या अध्यक्षीय भाषणात करून दिला. बुद्धांचा धम्म म्हणजे मानवाच्या जीवनातील अंधाराला प्रकाश देणारा एकमेव सम्यक विचार होय. या विचाराने मानवाची सम्यक जीवनशैली कडे वाटचाल सुरू होते आणि त्यायोगे मानव स्वतःची प्रगती साध्य करून घेऊ शकतो. विज्ञानवादी विचाराने ओतप्रोत भरलेल्या या धम्माने सम्पूर्ण जगाचे कल्याण होणार आहे आणि हेच शास्वत सत्य आहे.

    त्याचबरोबर सध्याची देशातील धार्मिक कट्टरता याचे बीमोड करनारा एकमेव विचार म्हणजे बुद्ध धम्म होय.असे प्रतिपादन डॉ. स्निग्धा कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.बुद्ध विहार च्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून सुधाकरजी पोपटे सर,भीमरावजी बनकर, सौ.पुष्पलता सुधाकर पोपटे, सुबोध हजारे सर ,दुर्योधन बनकर सर,अरुणा विद्यालय चे शिक्षक घुटके सर,गेडाम सर,नगदेवते सर व सरपंच सचिन लिंगायत आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल फुलझेले व आभार ताम्रपाल शेंडे यांनी केले.