करंजी येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

29

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.28एप्रिल):-तालुक्यातील करंजी गावी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा करंजी व जयंती उत्सव समिती, करंजीच्या वतीने नुकतेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पंचशील ध्वजारोहन सकाळी मा. माधवराव कलाने पाटील करंजी सोसायटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन मा. राहुल कऱ्हाळे (प्रकल्प अधिकारी यवतमाळ) यांचे हस्ते केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विजयराव लखडसे ( माजी आमदार उमरखेड )तर कविसंमेलनाचे अध्यक्ष मा. सुधाकर लोमटे (सुप्रसिद्ध साहित्यिक उमरखेड )यांनी पद भूषविले.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मा. प्राचार्य मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष पूर्णा.), मा. किशोर भवरे दलितमित्र (महापौर प्रतिनिधी नांदेड ), धम्मदीप काळबांडे (अध्यक्ष भा. बौद्ध महा उमरखेड तालुका), उत्तम कानिंदे (स्तंभलेखक किनवट ), प्रा. मुनेश्वर मॅडम, रंजना वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या बिटरगांव, शुद्धोधन घुगरे (सरपंच करंजी ) निवृत्ती काळबांडे, अनिल कांबळे ( सावळेश्वर पोलीस पाटील) संगीताताई कलाने (पोलीस पाटील करंजी),अभय कांबळे बिटरगाव, युवराज कलाने पाटील (इंजि.) हे उपस्थित होते.

आंबेडकऱी कविसंमेलनात सहभागी कवी किनवटचे साहित्यिक कवी रमेश मुनेश्वर सर, महेंद्र नरवाडे सर, रुपेश मुनेश्वर सर, प्रा. गजानन सोनोने सर.उमरखेड व परिसरातील कवी प्रा. शा. द. रोकडे सर, सहदेव शिंगणकर, भारत सूर्यवंशी, सुभाष शिंगणकर, मारोती काळबांडे, नारायण पाटील, गरुड, दगडू घुगरे, सुमेध घुगरे आदी कविंनी बहारदार रचना सादर करून अनेकांची मने जिंकली.मा. विजयराव खडसे मा. आमदार, किशोर भवरे, राहुल कऱ्हाळे या मान्यवरांची भाषणे झाली आणि आपल्या विचारातून जनतेवर प्रकाश टाकला.

संमोहन कार्यक्रम सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ मा. नवनाथ गायकवाड पुणे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधन कार्यक्रम झाला.सांस्कृतिक प्रबोधन महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक विजय पवार व गायिका संगीता पवार (गायकवाड )आणि त्यांचा संच मुदखेड यांचा गायनाचा वैचारिक सामना झाला.राजेश घुगरे अध्यक्ष भा. बौद्ध. महासभा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर, बापुराव वाढवे तर आभार कविसंमेलनाचे निमंत्रक -सुमेध घुगरे , व दिशांत घुगरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक भारतीय बौद्ध महासभा शाखा करंजी व जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी व तसेच दत्ता वि. घुगरे, प्रकाश सु. घुगरे जयघोष घुगरे,कोंडबा गो.घुगरे, संभा का. घुगरे, जांबुवंतराव घुगरे,गौतम घुगरे मिस्त्री,राहुल गायकवाड, राहुल घुगरे अरुण घुगरे , सुनिल घुगरे, दुर्गेश काळबांडे,कोंडबा राऊत, सतिश घुगरे, संदीप गाडेकर, अमोल घुगरे, काशिनाथ घुगरे आणि महिला मंडळींनी सुद्धा यांनी अथक परिश्रम घेतले तर परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.