प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात दमदार कामगिरी

✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

लातूर(दि.29एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व पत्रकारांनी लहुकुमार शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.मानवी मन अतिशय संवेदनशील आहे अशा संवेदनशील मनाला प्रेमाची किनार लाभली तर जीवन सुंदर बनते आणि जीवन जगण्याची उत्कंठा वाढते.प्रेम ही भावनाच हृदयापासून उत्पन्न होते व हृदयापर्यंत पोहोचते मग ते आईचे प्रेम असो, भावाचे प्रेम असो, किंवा प्रेयसीचे प्रेम असो. जे चिरकाळ टिकते तेच प्रेम असते. अशा आशयाचा “तू ही मेरी जान” (love story) हा हिंदी चित्रपट (short movi) लहान थोर व प्रौढ व वृद्धांनी पहावा असाच आहे.

या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक के मनोज असून निर्माता संजय प्रजापती आहेत. सहदिग्दर्शक रवी कुमार तर संगीत अजय राजा यांनी दिले आहे.मेन हिरोच्या भूमिकेत संजय कुमार असून पंडितजीच्या भूमिकेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष व सुवर्णयुगचे मुख्य संपादक लहूकुमार आहेत. मेन व्हीलन (राखा) च्या भूमिकेत विजयकुमार आहेत.लहुकुमार शिंदे यांच्या दमदार कामगिरीमुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य,विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी व मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED