कर्ज बाजारामुळे पुन्हा एका शेतकर्यांनी केली आत्महत्या

62

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.29एप्रिल):- अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील तेलंगणा सीमेला लागून नारायण गुडा येथील घटना सततच्या कर्जबाजारीपणामुळे माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे या शेतकऱ्यांनी शेतातच आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती उध्दव गोतावळे जिवती तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना दलित आघाडी यांनी दिली,महाविकास आघाडी सरकारच धोरण फक्त शेतकऱ्यांच मरण हाच दिसत आहे.

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतेही अनुदान सरकार कडून मिळत नाही म्हणून खाजगी सावकाराकडून कर्ज काढून जगावं लागत आणि कर्ज घेऊनच शेती करावं लागतं वरून शेतमालाला भाव मिळत नाही आणि निसर्गाचं मार मग हा शेतकरी जगावं तरी कसं पण कोणी यावर विचार करत नाही. शेतकरी आत्महत्या का करत आहे या मागचा कारण काय खोलवर जाऊन कोणीच बघत नाही, शेतकरी आत्महत्येचा मूळ कारण म्हणजे जमिनीचे पट्टेचा आहे.

शासनाने जर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले तर 99% शेतकरी आत्महत्या थांबेल कारण ज्यांच्याकडे पट्टेच नाही त्यांना कोणतीच योजनेचा लाभ घेता येत नाही कोणताही अनुदान त्यांना मिळत नाही, मग त्यांना कर्जापायी एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या?मग महाविकास आघाडी सरकारच धोरण काय? फक्त शेतकऱ्यांचा मरण हाच का असा प्रश्न शेतकरी संघटना दलित आघाडीचे उध्दव गोतावळे यांनी उपस्थित केला आहे?