५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात उप आयुक्त वामन कदम यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा कारवाई नाही

49

🔸जिल्हाधिकारी व जिल्हापुरवठा आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.29एप्रिल):-जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन १० दिवस झाले तरी सुद्धा अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्यामुळेच
संबधित जिल्हाधिकारी बीड व जिल्हापुरवठा आधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उप आयुक्त (पुरवठा)औरंगाबाद वामन कदम यांना केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव
____
उप आयुक्त(पुरवठा)औरंगाबाद वामन कदम यांनी बीड जिल्हाधिका-यांना ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून तत्कालीन प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठा आधिकारी एस.के.मंदे यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून जिल्हा पुरवठा आधिका-यांनी कारवाई केली नाही म्हणून त्याचाही खुलासा मागविण्यात आला आहे, असे असताना आज दि.२८ एप्रिल रोजी १० दिवस होऊन सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला नसुन जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करण्यात येत असून भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल संबधित जिल्हाधिकारी बीड व जिल्हा पुरवठा आधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे