जल, जमीन, जंगल निसटण्यापूर्वी आदिवासी वैभव संविधानाच्या माध्यमातून उभे करा : प्राध्यापक सुषमाताई अंधारे

🔸महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सविधान जनजागृती कार्यक्रम

🔹बिरसा ब्रिगेड व महिला बिरसा ब्रिगेड चा समाजशिल उपक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29एप्रिल):-जात नव्हे विचार जोडण्याची गरज आहे. मतांचा अधिकार सजगपणे बजावा. नवीन नेतृत्व निर्माण करा. सामाजिक व आर्थिक दरी कमी करण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करीत अनेक उदाहरणांनी प्रबोधनकार सुषमाताई अंधारे यांनी संविधान चे महत्व पटवुन दिले. जल, जमीन, जंगल निसटण्यापूर्वी आदिवासी वैभव उभ करण्याची ताकद संविधानाच्या माध्यमातून व बिरसा ब्रिगेडच्या चळवळीतून उभी करा असे जाहीर आवाहन प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी भारतीय संविधान व आदिवासी चळवळी समोरिल आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
बिरसा ब्रिगेड व महीला बिरसा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने जनजागृती करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.२५/०४/२०२२ रोजी केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक आ. इंद्रनिलभाऊ मनोहरराव नाईक यांचे हस्ते व माधवराव वैद्य (माजी सहा.आयुक्त समाज कल्याण अधिकारी,पुणे) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुषमाताई अंधारे (प्रबोधनकार) , स्वागताध्यक्ष पांडुरंग व्यवहारे (विदर्भ अध्यक्ष-बिरसा ब्रिगेड) यांचेसह रामकृष्ण चौधरी (आदिवासी सेवक),ॲड आशिषभाऊ देशमुख (माजी अध्यक्ष तथा सदस्य महा.अँड गोवा बार कॉन्सील), शरद मैन्द (अध्यक्ष-सद्भावना मंच पुसद), शिवाजी गवई (सहाय्यक गटविकास अधिकारी, पं.स.पुसद), श्रीमती आशाताई पांडे (माजी सभापती पं.स.पुसद), सौ. वर्षाताई माधवराव वैद्य (अध्यक्ष म.मु.पत. संस्था,बोरगडी पुसद), डॉ.श्री. शिवाजी भुरके (संचालक- संजीवनी हॉस्पीटल, पुसद), विश्वास भवरे (माजी पं.स.सदस्य पुसद), सुरेश धनवे (बिरसा ब्रिगेड मार्गदर्शक, व्ही.सी. जाधव (सामाजिक कार्यकर्ता), आत्माराम धाबे (प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. विभगा पुसद), शरद ढेंबरे (ग्रा.पं.सदस्य,बोरगडी) ॲड. आरिफ अहेमद, ॲड वसंत गव्हाळे (प्र.अधिकारी बार्टी तथा प्रवक्ता बिरसा ब्रिगेड), भास्कर मुकाडे (अमरावती विभागीय शिक्षक संघ यवतमाळ जिल्हासचिव) प्रा महेश हंबर्डे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे रूपरेषा वसंत गव्हाळे ब्रिगेड प्रवक्ता यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडली. फुले शाहूंचे विचार फिरण्याची गरज आहे. संविधान जनजागृती च्या दृष्टीने योग्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या उद्घाटनपर दिलेल्या भाषणातून केले. तर अध्यक्षीय भाषणातून माधवराव वैद्य यांनी सर्वांनी संविधानाची प्रत घरी ठेवावी ती अंगीकारावी असे अनमोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बिरसा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष मारोती भस्मे, कार्याध्यक्ष गजानन भोगे, उपाध्यक्ष सखाराम इंगळे, आतिष वाघमारे, सचिव विष्णु शिकारे, कोषाध्यक्ष संजय डुकरे, सल्लागार :परशराम डवरे,अनंत माळकर, शहराध्यक्ष राजु कळंबे, कार्याध्यक्ष संदेश पांडे, उपाध्यक्ष विठ्ठल मिरासे, सचिव पंकज वंजारे, सहसचिव प्रशांत पांडे, विद्यार्थी बिरसा ब्रिगेड तालुका अध्यक्ष अक्षय पांडुरंग व्यवहारे, चंदू कोकाटे , प्रदीप नारायण घावस, करण माधव इंगळे, निलेश बेले, किरण धनवे, शंकर असोले , सर्कल अध्यक्ष राजु पेदेवाड हर्षी, बाळु कुरुडे बेलोरा, विलास बोरकर जामबाजार, माधव कळंबे मोहा, देवानंद अंबोरे काळी, अदित्य व्यवहारे, संतोष बोडखे शेंबाळपिंप्री. प्रविण दुमारे श्रीरामपुर तसेच महिला बिरसा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष सुनिताताई मळघणे, शिल्पा सरकुंडे, मिना व्यवहारे, मनिषा बेले, छाया बळी, गोकुळा बोडखे,शांताबाई बेले, सुनिता रिठे, सरस्वतीबाई वंजारे, वंदना वानोळे, उषा टारफे, चंद्रकला तडसे, सविता धनवे, पुनम व्यवहारे, माधुरी नांदे, कुसून मारकड, महानंदा वंजारे, संतोषी पिंपळे, वर्षा खराटे, रेखा आमले, मथुरा दुमारे, पंचफुला इंगळे, रेणुका जंगले, राधा हजारे, ज्योती आगलावे, त्रिवेणी डोंगरे, सुनिता जंगले, पुष्पा वंजारे, जनाबाई झाडे, कमल देवकर, संगिता तोरकड, रंजना डोईफोडे, अन्नपुर्णा कळंबे, मनकर्णा गुव्हाडे, विमल खंदारे, शारदा काळे, जनाबाई तांबारे, संगिता खराटे, छाया खराटे, अरुणा डवरे, उषाताई ढगे, वर्षाताई उगले, लक्ष्मीबाई भुजाडे, वंदना मस्के, कौशल्या आढाव, विमल सातपुते, गोदावरी आढाव, लिलाबाई कुरकुटे, शिल्पा सरकुंडे, पंचफुला इंगळे , कुसुंम मारकड , महानंदा जंगले , योगिता दुमारे , पार्वताबाई अस्वले , रेखा मुरमुरे , कु. गौरी टाराफे , लताबाई नांदे , वनिता बुरकुले , राधा व्यवहारे, सिता भवाळ, सभदा क-हाळे, संगिता काळे लक्ष्मी शेळके, पुष्पा खोकले यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजनासाठी नवतरुण कर्मचारी संघटनेचे अनमोल सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नवतरुण कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संदीप व्यवहारे यांनी तर उपस्थितांचे आभार बिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुजन विचाराचे सर्वांनीच मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. शिस्तबद्ध कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनाचे संविधान जनजागृतीच्या या कार्यक्रमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आयोजनामुळे आयोजकांची सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक दिनेश चन्द्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED