देशात संसदेपेक्षा धर्मसंसदेला अधिक महत्व:प्रा.शरद गायकवाड;डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30एप्रिल):-जातीयवादी वायर्स समाज पोखरत आहे त्यास फुले ,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा बूस्टर डोस देने गरजेचे आहे.जाती अंता ऐवजी जात उफाळून येत आहे त्यामुळे लोकशाही संकटांत आहे असे प्रतिपादन प्रा.शरद गायकवाड यांनी केले.राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे ‘फुले आंबेडकरी चळवळ आणि आजचा बहुजन समाज’ या विषयावर बोलत होते अध्यक्ष स्थानी विजय काळेबाग होते.

प्रा.गायकवाड म्हणाले महापुरुषांनी जातीव्यवस्थेला मूठमाती दिली परंतु काही विघनसंतोषी लोक याला खतपाणी घालत आहेत समाजासमाजात तेढ निर्माण करत आहेत मोठ्या ओरमानात स्त्रियांवर अन्याय होत आहे अंधश्रद्धेच्या दावणीला समाज बांधला जात आहे.छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू हे विज्ञानवादी होते अंधश्रद्देला त्याचा विरोध होता;पण बहुजन समाजात अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणात आश्रय दिला जात आहे. अंधश्रद्धेला पाठीशी घालणाऱ्या लोकांनी शिव,शाहू,फुले,आंबेडकरी विचार आत्मसात केले पाहिजे असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

मन आणि मत परिवर्तन झाल्याशिवाय समाजात बदल घडणार नाही ज्या समाजात आपला जन्म झाला आहे त्या समाजाच्या विकासाठी प्रयत्न झसला पाहिजे बहुजन समाजाचा विकास होणे गरजेचे आहे असेही प्रा.गायकवाड म्हणाले.सतिशचंद्र कांबळे,व्यकप्पा भोसके,एस.के.दिघे,प्रा.शहाजी कांबळे उपस्थित होते.रुपया वायदंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.संजय माळी यांनी स्वागत केले.