शिक्षक संघ अपडेट शिक्षक संघाचे मागणीनुसार बॅक मेन्टेनन्स चार्जस व मिनीयम बॅलन्स अट व इतर चार्ज न घेणे मागणीला यश

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30एप्रिल):-सातारा जिल्हा शिक्षक संघाचे वतीने आदरणीय चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक आदरणीय नितीन (काका) पाटील यांना निवेदन देऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अनिल भाऊ देसाई यांच्या पाठपुराव्यातून मेन्टेनन्स चार्ज व मिनीयम बॅलन्स यामुळे अनुदान पाञ विद्यार्थीना पोषण आहार व इतर देयके देताना देणारे रकमेत तफावत येवुन अडचणी येत होत्या.यावर चेअरमन यांचेशी चर्चा होवुन चार्ज न घेण्याचे ठोस आश्वासन मिळाले व त्याचे आज पञ देवुन शिक्षक संघाचे मागणीचा तात्काळ विचार झालेने सातारा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना दिलासा मिळाला आहे.

या पुर्ततेसाठी अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सन्माननीय सिद्धेश्वर पुस्तके (दादा) यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष महेंद्रजी जानुगडे ,शिक्षक बॅकेचे व्हा. चेअरमन महेंद्रजी अवघडे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, माजी शिक्षण कमिटी तज्ञ सदस्य राजाराम तोरणे,शिक्षक संघाचे जेष्ठ नेते मोहनराव जाधव, शिक्षक नेते पोपटराव जाधव ,शिक्षक संघाचे नेते सुधाकर काटकर , माण शिक्षक संघाचे नेते विजय काटकर ,अभ्यासू हरहुन्नरी व्यक्तिमत्व हेमंत देशमुखे, शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय काटकर , आदर्श शिक्षक संजय सूर्यवंशी,यानी निवेदन देवुन पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावला.