पत्रकार विरोधी हल्याअंतर्गत कारवाईसाठी जिल्हाधिकारी-पोलीस अधिक्षकांना निवेदन, आंदोलनाचा ईशारा:-डाॅ.गणेश ढवळे

21

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.30एप्रिल):-पाटोदा येथिल पत्रकार यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक, पत्रकार हमीदखान पठाण यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देऊन आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

सविस्तर माहीतीस्तव:-
___
शेख जावेद शेख रज्जाक रा.पाटोदा.जि.बीड हे मराठी पत्रकार परीषद संलग्न सोशल मिडीया पाटोदा तालुकाध्यक्ष तथा सायं.दैनिक बीड दिव्य वार्ताचे पाटोदा प्रतिनिधी यांच्यावर दि.१३ एप्रिल २०२२ रोजी पाटोदा शहरातील महासांगवी रोड लगत राजमहंमद दर्गाह सर्व्हे नंबर ७१४ येथील सुरू असलेल्या अतिक्रमित बांधकामाची छायाचित्रे बातमी संदर्भात काढल्याचा राग मनात धरून त्यांच्या समीर सायकल स्टोअर्स दुकानात बांधकाम करणारे समदखान हमीदखान पठाण आणि त्यांचा मुलगा समीरखान समदखान पठाण यांनी फोटो का काढले म्हणत लोखंडी राॅडने डोक्यात वार करत जीवघेणा हल्ला केला, त्यानंतर मला पाटोदा ग्रामिण रूग्णालयात व नंतर बीड जिल्हारूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. संबधित प्रकरणात दि.१७ एप्रिल २०२२ रोजी पाटोदा पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.कोळेकर यांनी जवाब लिहुन घेतला परंतु पत्रकार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी असा लेखी जवाब देऊन सुद्धा कलम लावण्यात आले नाही त्यामुळेच संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून पत्रकार विरोधी हल्ला कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
___

पाटोदा येथिल पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावरील जीवघेणा हल्लाप्रकरणात पत्रकार विरोधी हल्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी १ मे रविवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय संविधान पठण आंदोलन करण्यात येणार आहे