सद्गुरू माता सुदीक्षाजींचा महाराष्ट्र दौरा जाहीर

63

🔹एकूण दहा दिवस सत्संगाची संधी: संत निरंकारी मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30एप्रिल):-विश्वविख्यात संत निरंकारी मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी यांचा महाराष्ट्र राज्यातील दौरा नुकताच जाहीर झाला आहे. दौऱ्यादरम्यान दहाही दिवस सत्संगाची संधी महाराष्ट्रीयन जनतेला मिळणार आहे. सदर दौऱ्याचे वेळापत्रक संत निरंकारी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचार धारा म्हणून जगाच्या पाठीवर आपली अमिट छाप उमटून आहे. संत निरंकारी मिशनचे सर्वेसर्वा, प्रमुख तथा विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज आहेत. संतभूमी महाराष्ट्राच्या मराठी मातीत सद्गुरू माता सुदीक्षाजींच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या आध्यात्मिक सत्संग कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सत्संग कार्यक्रमासाठी माताजींचा दौरा येत्या १ मे २०२२ पासून सुरू होऊन तो तब्बल दहा दिवस चालणार आहे. दोन वर्षांच्या कोरोना कळात धीर धरून असलेल्या भक्तमंडळीची गर्दी पाहता सर्वच सत्संगस्थळी व्यवस्थेच्या कामी निरंकारी सेवादलाचे जवान युद्धपातळीवर जुटले आहेत. दौऱ्यादरम्यान इच्छुकांना त्यात सत्संग, दर्शन व प्रवचनांचा आनंद घेता येणार आहे.

दौऱ्यादरम्यान होणाऱ्या सत्संग कार्यक्रमाचे वेळापत्रक मंडळाच्या संकेत स्थळाप्रमाणे- नवी मुंबईच्या खारघर येथील सिडको ग्राऊंडवर रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते ९, पुणे येथे सोमवार दिनांक २ मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ८.३०, सोलापूर येथे मंगळवार दिनांक ३ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, लातूर येथे बुधवार दिनांक ४ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, नांदेड येथे गुरुवार दिनांक ५ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, हिंगोली येथे शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, अकोला येथे शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, अमरावती येथे रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९, वर्धा येथे सोमवार दिनांक ९ मे २०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ९ आणि नागपूर येथे मंगळवार दिनांक १० मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ ते ८.३० असे जाहीर करण्यात आले आहे.