


🔸मा.संतोष जोगदंडे (उमरखेड तालुकाध्यक्ष) यांचे नेतृत्वात जाहीर प्रवेश
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.30एप्रिल):-आज रेस्ट हाऊस मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी पक्षवाढीसाठी पक्ष जाहीर प्रवेश चा कार्यक्रम आयोजित केला होता.
वंचित बहुजन आघाडी चे यवतमाळ जिल्हा पक्षनिरीक्षक सन्माननीय मोहनराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मा.संतोष जोगदंडे (तालुकाध्यक्ष) यांचे नेतृत्वात जाहीर प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मा. देवानंद पाईकराव साहेब (तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष) यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
तरुण तडफदार, स्वाभिमानी युवा नेतृत्व मा. देवानंद पाईकराव साहेब यांनी मागील काळात उमरखेड तालुक्यात रिपब्लिकन सेनेला घराघरात पोहोचवण्याचे काम यांनी केले.
पण काही कारणास्तव पक्ष सोडावा लागला म्हणून रेस्ट हाऊस उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी जिल्हा महासचिव डि.के दामोदर, जॉन्टीभाऊ विनकरे, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खाडे साहेब, वंदनाताई भवरे, सभापती संबोधी गायकवाड, मार्शल विनोद बरडे सर, एस.के मुनेश्वर सर, अर्जुनराव बरडे, बाबुरावजी नवसागरे, भीमरावजी हापसे, आनंदराव वाहुळे संपूर्ण तालुका कार्यकारणी च्या उपस्थिती पक्ष प्रवेश संपन्न झाला.




