जितेंद्र महाजन यांचा संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या हस्ते सत्कार

    45

    ✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    चोपडा(दि.30एप्रिल):-लासुर येथील श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्था लि.लासुर च्या व्हा चेअरमन पदी श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड व राष्ट्रीय सचिन सुनिल गुलदगड हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त आल्यावर त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच त्यांनी जितेंद्र महाजन यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    त्याप्रसंगी लासुर येथील माळी समाजाचे अध्यक्ष ए के गंभीर सर, माळी समाजाचे विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच श्री संत सावता माळी युवक संघाचे खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन, जिल्हा सल्लागार विनायक महाजन, जिल्हा संपर्क प्रमुख निलेश महाजन, चोपडा शहर अध्यक्ष रोहित माळी व युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.